Crop Insurance : पावसाचा आघात सुरू; पण विमा कंपनी स्वीकारेना तक्रार

Crop Damage
Crop DamageAgrowon

औरंगाबाद : ‘‘पीकविमा नुकसान भरपाईसाठी (Crop Damage Compensation) एकदा तक्रार दिली की पुन्हा कितीही नुकसान (Crop Damage) झाले तरी तक्रार स्वीकारली जात नाही. मग वारंवार नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) होणारे नुकसान कळवायचे तरी कसे,’’ असा सवाल करत सोयगाव तालुक्यातील शेतकरी ईश्‍वर सपकाळ यांनी आपली पीक नुकसानीची व्यथा मांडली.

Crop Damage
Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सपकाळ म्हणाले, ‘‘यंदा एकूण पिकांपैकी सात हेक्टर कपाशी, दोन हेक्टर उडीद, दीड हेक्टर मूग व ८० आर तूर पिकाचा विमा शासनाच्या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला. आधी अतिवृष्टीमुळे झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ऑनलाइन तक्रार केली. त्याचा पंचनामाही झाला. परंतु सहा दिवसांपासून पुन्हा एकदा वादळ व जोरदार पाऊस होत आहे.

Crop Damage
Mango Crop Insurance : कोकणातील आंबा पिकासाठी विमा योजना

४ ऑक्टोबरला वादळासह आलेल्या पावसात कपाशीची अनेक झाड मोडली. पाच ते नऊ ऑक्टोबरदरम्यान सततच्या पावसाने कपाशीच्या पिकाची पुरती वाट लागली. फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या, बोंडे सडली. ऑनलाइन तक्रार नोंदवून कंपनीला कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा तक्रारीचा पर्याय नसल्याने ती स्वीकारली जात नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीसह तहसीलदारांना या विषयी अवगत केले. त्यामधून पुन्हा तक्रारीचा पर्याय नसल्याची बाब समोर आली.

ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थेत एकदा झालेल्या नुकसानीची तक्रार केल्यानंतर पुन्हा अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास तक्रारच करता येत नाही. त्यामुळे नुकसानीचे काय करावे, या विवंचनेत असल्याचे सपकाळ म्हणाले. या संदर्भात ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक कांबळे म्हणाले, ‘‘पुन्हा तक्रारीचा पर्याय नाही, परंतु मंडळातील पीक उत्पादकतेमध्ये घट आल्यास काढणीपश्‍चात पीकविमा नुकसान भरपाई मिळू शकते.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com