द्राक्षासाठी विमा योजना

मृग बहर-२०२२ मध्ये द्राक्ष पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
द्राक्षासाठी विमा योजना

मृग बहर-२०२२ मध्ये द्राक्ष पिकासाठी (Grape Crop) ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. द्राक्ष पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. द्राक्ष बाग वय वर्ष दोन पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील. द्राक्ष पिकासाठी पाऊस, आर्द्रता व किमान तापमान या हवामान घटकापासून होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण देण्यात आले आहे.

द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षण आणि प्रमाणके

विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टरी ः ३,२०,००० रुपये

शेतकऱ्यासाठी विमा हप्ता प्रति हेक्टरी ः १६,००० ते ६४,००० रुपये

१) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हा निहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

२) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

३) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

४) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र , फळबागेचा जिओ टॅगींग केलेला फोटो, बँक पास बुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि कंपनी जिल्हे---विमा कंपनीचे नाव

नाशिक---रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,

सांगली---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

पुणे---भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.

१) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

२) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

३) शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

४) भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक १४ जून, २०२२.

५) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन संकेत स्थळ www.maharashtra.gov.in वर दिनांक १८/०६/२०२१ रोजीचा संबंधित शासन निर्णय पहावा. आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

----------------

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे मुख्य सांख्यिक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com