डाळिंबासाठी विमा योजना

मृग बहर-२०२२ मध्ये डाळिंब पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

मृग बहर-२०२२ मध्ये डाळिंब पिकासाठी (Pomegranate Crop) ही योजना अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी (Insurance Company) शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. डाळिंब बाग वय वर्षे दोन पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.

डाळिंब पिकासाठी विमा संरक्षण कालावधी प्रमाणके

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके)---विमा संरक्षण कालावधी--- प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

पावसाचा खंड --- १५ जुलै ते १५ ऑगस्ट--- या कालावधीत सलग २० दिवस खंड राहिल्यास ५,९०० रुपये.

--- या कालावधीत सलग २१ ते २५ दिवस खंड राहिल्यास ११,८०० रुपये. या कालावधीत सलग २५ दिवस पेक्षा जास्त खंड राहिल्यास १७,७०० रुपये.

पावसाचा खंड ---१६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर--- या कालावधीत सलग २० दिवस खंड राहिल्यास १७,२०० रुपये.

--- या कालावधीत सलग २१ ते २५ दिवस खंड राहिल्यास २९,००० रुपये.

---- या कालावधीत सलग २५ दिवसांपेक्षा जास्त खंड राहिल्यास ४१,३०० रुपये.

जास्त पाऊस --- १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर--- या कालावधीत एका दिवसात ४५ मि.मी. ते ६० मि.मी. पाऊस पडल्यास ११,८०० रुपये.

--- या कालावधीत एका दिवसात ६० मि.मी. ते ९० मि.मी. पाऊस पडल्यास २९,००० रुपये.

---- या कालावधीत एका दिवसात ९० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडल्यास ७१,००० रुपये.

-----------------

(टीप ः २.५ मि.मी.पर्यंत पाऊस पडला तरी तो खंड समजला जाईल)

विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टरी ः १,३०,००० रुपये

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता प्रति हेक्टरी. ः ६,५०० रुपये.

१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुक वरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागते.कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी जिल्हे---विमा कंपनीचे नाव

नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, धुळे, सोलापूर--- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, सातारा, परभणी, जालना, लातूर---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

बुलडाणा, जळगाव, पुणे, उस्मानाबाद---- भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.

१) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरपैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

२) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

३) शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

४) भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक १४ जुलै २०२२.

५) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन संकेत स्थळ www.maharashtra.gov.in वर दिनांक १८/०६/२०२१ रोजीचा संबंधित शासन निर्णय पहावा. आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

--------------------------------

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे मुख्य सांख्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com