‘जलयुक्त शिवार’ची चौकशी पूर्ण

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
Jalyukt Shiwar Scam
Jalyukt Shiwar ScamAgrowon

नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या (Jalyukt shiwar Scheme) कामात गैरव्यवहार (Jalyukt Shiwar Scam) झाल्याचा ठपका ठेवत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी या प्रकरणाची चौकशी (Jalyukt Shiwar Investigation) करण्याचे आदेश दिले होते. नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत झालेल्या १३ कामांची चौकशी पूर्ण झाली असून अहवालही शासनाकडे सादर करण्यात आला. आता देवेंद्र फडणवीस सत्तेत असून उपमुख्यमंत्री पदावर आहेत. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jalyukt Shiwar Scam
‘जलयुक्त’ घोटाळ्याचा चौकशी अधिकारी बदलला

उद्धव ठाकरे सरकारने या कामाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन केली होती. जवळपास दीड लाखांवर कामांचे वर्क ऑडिट करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत १३ कामांची चौकशी एसीबीने केली. नाला, तलाव खोलीकरण करून पाणी पातळीत वाढ करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना लागू केली होती. सिंचनातून समृद्धीसाठी ही योजना मैलाचा दगडसुद्धा ठरली, असा दावा सरकारचा होता. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार आले.

Jalyukt Shiwar Scam
‘जलयुक्त शिवार'चे १५ कोटी हडपले

या योजनेच्या कामात गैरव्यवहार व नियमबाह्य कामांच्या तक्रारी झाल्या. जवळपास ५० हजारांवर कामांचे वर्क ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही संपूर्ण चौकशी सोपविण्यात आली होती. कामांची गुंतागुंत आणि एसीबीकडे पुरेसा तज्ज्ञ वर्ग नसने तसेच काम केलेल्या एजन्सीकडून सहकार्य मिळत नसल्याने या चौकशीला अधिक वेळ लागला. ठाकरे सरकार पडण्याच्या पाच महिन्यांपूर्वी हा अहवाल गृहविभागामार्फत शासनाला पाठविण्यात आला.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाची १३ कामे होती. भिवापूर, नरखेड आणि काटोल तालुक्यातील कामांचा समावेश होता. तसेच मृद्संधारण विभाग, जिल्हा कृषी विभागाअंतर्गत कामाची वेगळी चौकशी होती. प्रथमदर्शनी, यातील काही कामांत घोळ झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार यावर काय भूमिका घेते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com