Irrigation Scheme : सिंचन योजना गतीने पूर्ण कराव्यात ः शेखावत

राज्यातील जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना आदी योजनांची राज्यातील अंमलबजावणी ही वेळेत आणि गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे.
Irrigation Schem
Irrigation SchemAgrowon

मुंबई : ‘‘राज्यातील जलजीवन मिशन, (Jaljeewan Mission) स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, (Agriculture Irrigation Scheme) अटल भूजल योजना आदी योजनांची राज्यातील अंमलबजावणी ही वेळेत आणि गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. यंत्रणांनी त्यादृष्टीने कामे करावीत,’’ असे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी दिले.

Irrigation Schem
Irrigation Subsidy : ‘नरेगा’तून विहिरींसाठी शेतकऱ्यांना मिळणार आता चार लाखांचे अनुदान

सह्याद्री अतिथिगृह येथे शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय आढावा बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

शेखावत म्हणाले,‘‘महाराष्ट्र सरकारने विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना आदी योजनांची राज्यातील अंमलबजावणी ही वेळेत आणि गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. यंत्रणांनी त्यादृष्टीने कामे करावीत. जलजीवन अभियानातील कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकारने या योजनांसाठी दिलेला निधी विहित वेळेत खर्च होईल आणि योजनांची कामे मार्गी लागतील.’’

Irrigation Schem
Irrigation Subsidy : आता विहिरीसाठी मिळणार अनुदान

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘राज्यामध्ये जल शक्ती मंत्रालयाशी संबंधित विविध प्रकल्प आणि योजनांची अंमलबजावणी गतीने केली जाईल. केंद्र सरकारकडून राज्याला अधिकाधिक सहकार्य मिळत आहे. राज्य शासन हे सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सामान्य माणसांशी निगडित स्वच्छ भारत मिशन, ‘हर घर जल’सारख्या योजना वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

’’ बळीराजा जलसंजीवनी योजनेतील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील कामे वेळेत पूर्ण करून तेथील बळीराजाला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्पांद्वारे पुराचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा अवर्षणप्रवण भागाला लाभ देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मार्गी लावला जाईल.’’

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘या बैठकीतून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिशा मिळेल. या मंत्रालयाने दिलेल्या सूचना निश्‍चितपणे उपयुक्त आहेत. त्या दृष्टीने निश्‍चितपणे कार्यवाही केली जाईल. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला अधिक वेग दिला जाईल.’’

‘नदी जोड प्रकल्पाला मदत करा’

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पुराचे वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी नदी जोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यासाठी केंद्राने अधिक मदत करावी. बळीराजा जलसंजीवनी अभियानात १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात काम सुरू आहे. या कामाला अधिक गती दिली जाईल. विविध प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. कामे वेळेत पूर्ण होण्याला आमचे प्राधान्य आहे. सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य पातळीवर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com