Jalyukta Shivar Scheme : अमरावती जिल्ह्यातील २२८ गावांत जलयुक्त शिवार योजना राबविणार

Jalyukta Shivar Update : अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी २२८ गावांची निवड करण्यात आली आहे.
Jalyukta Shivar
Jalyukta ShivarAgrowon

Jalyukta Shivar In Amravati : अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी २२८ गावांची निवड करण्यात आली आहे. खारपाणपट्ट्यातील भातकुली व दर्यापूर तालुक्यात प्रत्येकी फक्त बारा गावांत ही योजना राबविण्यात येणार असून, उर्वरित तालुक्यातील १७ गावांची निवड झाली आहे.

त्यासाठी गावनिहाय आराखडे तयार करण्यात येत असून, मे व जूनमध्ये शक्य न झाल्यास डिसेंबरमध्ये योजनेचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली होती. पुन्हा सत्तांतरानंतर विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना कार्यान्वित केली आहे.

यावेळी योजनेच्या कार्यान्वयन समितीमध्ये बदल करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेतील समितीत जिल्हा जलसंधारण अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून भूजल सर्वेक्षण विभाग व कृषी विभाग सदस्य आहेत.

Jalyukta Shivar
Jalyukta Shivar : ‘पुनश्च हरिओम’; जलयुक्त शिवारची आजपासून सुरुवात

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे सहअध्यक्ष आहेत.जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये भातकुली व दर्यापूर या खारपाणपट्ट्यातील दोन तालुक्यांतील प्रत्येकी १२ व अमरावती, अचलपूर, धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्‍वर, धामणगावरेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी व तिवसा या तालुक्यांतील प्रत्येकी १७ गावांची निवड करण्यात आली आहेअसे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप निपाणे यांनी सांगितले.

चार वर्षांत झालेली कामे

वर्ष - निवडलेली गावे - पूर्ण झालेली कामे - खर्च (कोटी)

२०१५-१६ - २५३ - ५६०० - १३०.१९

२०१६-१७- २५३ - ४७२६ - १५०.०६

२०१७-१८- २५२- ४१२४- ६२.६२

२०१८-१९ - २९४- ३२१०- ५२.९४

एकूण- १०५२- १७,६६० - ३९५.८१

Jalyukta Shivar
Jalyukt Shiwar 2.0 : 'जलयुक्त'च्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना आजपासून सुरूवात
मे व जून महिन्यात पावसाची उघडीप मिळाल्यास काम सुरू करता येणार आहे. अन्यथां डिसेंबर महिन्यापासून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. गाव आराखडे व नियोजन करण्यात येत असून येत्या आठ दिवसांत ते पूर्ण होतील.
दिलीप निपाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com