Crop Insurance : पीकविमा सर्वेक्षणात नुकसानीबाबत गांभीर्याचा अभाव

सध्या तालुक्यात पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. यामध्ये एक नमुना भरला जात असून त्यात विविध मुद्द्यांचा समावेश दिसतो. प्रामुख्याने पीकविमा काढलेले पीक, पीक वाढीची अवस्था, लागवड पद्धत, नुकसानाची कारणे, नुकसानग्रस्त क्षेत्र असे मुद्दे आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः गेल्या अडीच महिन्यांत पावसाने यंदाचा खरीप हंगाम (Kharif Season) देशोधडीला लावला आहे. आता उभ्या असलेल्या खरीप पिकांपासून किती उत्पादन (Crop Production) येईल, याचा निश्चित ठावठिकाणा नाही. अशातच आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण (Crop Damage Survey) केले जात असून योग्य माहितीचे सर्वेक्षण व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Crop Insurance
Crop Damage : तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

सध्या तालुक्यात पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. यामध्ये एक नमुना भरला जात असून त्यात विविध मुद्द्यांचा समावेश दिसतो. प्रामुख्याने पीकविमा काढलेले पीक, पीक वाढीची अवस्था, लागवड पद्धत, नुकसानाची कारणे, नुकसानग्रस्त क्षेत्र असे मुद्दे आहेत. मात्र, यामध्ये ठोस तांत्रिकतेचा अभाव दिसून येत असल्याने पीकविमा कंपनीकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका आतापासूनच व्यक्त केली जात आहे.

Crop Insurance
Crop Damage : ऑगस्टमध्ये १ लाख ३७ हजार हेक्टरवर पिकांना पावसाचा फटका

याबाबत राजकीय नेते, शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील नवीन सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असा गाजावाजा केला जात आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी पीकविमा कंपनीकडून केले जात असलेले सर्वेक्षण दोषयुक्त दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण होऊ लागली आहे.

पीकविम्याचे सर्वेक्षण करताना आढळणाऱ्या त्रुटी

- सर्वेक्षकांकडून पिकाचे किती नुकसान झाले याची नोंद केली जात नाही.

- पिकाला फूल लागलेले लिहिले जात आहे. परंतु पाण्यामुळे पिकाची वाढ कमी झाली आहे, फुलांची संख्याही तुरळक आहे, असा उल्लेख केला जात नाही.

- सर्वेक्षण करणारे किती अनुभवी किंवा तांत्रिकदृष्ट्या ज्ञान असलेले आहेत हे समजत नाही.

- विमा कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम दुसऱ्या एका कंपनीला दिल्याची माहिती आहे.

- माहिती सदोष गोळा झाली आणि पुढील टप्प्यात भरपाईमध्ये जर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश झालेला नसेल तर याचा रोष कृषी विभागाला झेलावा लागू शकतो. यासाठी आताच संबंधितांनी नोंद घेत जागरूक होणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com