Lasalgaon Onion Market : ‘स्मार्ट’अंतर्गत क्रमवारीत लासलगाव बाजार समिती प्रथम

जागतिक बँक अर्थसाह्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.
Lasalgaon Onion Market
Lasalgaon Onion MarketAgrowon

नाशिक : जागतिक बँक (World Bank) अर्थसाह्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (SMART Project) बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने (Lasalgaon APMC) राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

Lasalgaon Onion Market
Onion Market: कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात का?

स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यस्तरीय क्रमवारीत बाजार समितीस मानांकन निश्‍चित केले असल्याचे बाजार समितीस कळविल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. लासलगाव बाजार समितीच्या २०२१-२२ या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पाहणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांच्या कार्यालयाने वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता. त्याप्रमाणे प्रस्तावांची छाननी करून एकूण २०० गुणांपैकी १६३ गुण देऊन क्रमवारीत प्रथम क्रमांक दिलेला आहे.

Lasalgaon Onion Market
Onion Rates:चाळीतील कांदा मोजतोय अखेरची घटका
राज्यात प्रथमच अशा प्रकारची बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. लासलगाव बाजार समितीच्या यशस्वी कामगिरीत सर्व सहकारी सदस्य, शेतकरी, अडते, व्यापारी, माथाडी मापारी कामगार, मदतनीस व बाजार समितीचे सचिव, इतर अधिकारी व कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. या पुढेही शेतकरी हितासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे.
सुवर्णा जगताप, सभापती
बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये बाजार समितीने प्रथम क्रमांक पटकाविला. हे स्थान कायम राखण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत.
नरेंद्र वाढवणे, सचिव

कामकाज दृष्टिक्षेपात...

लासलगाव बाजार समितीने शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्गाशी समन्वय साधून अमावास्या, शनिवार व इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी लिलावाचे कामकाज सुरू केल्यामुळे वर्षभरात लिलावाचे कामकाज वाढले. तसेच उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीमाल लिलावासाठी मुख्य व उपबाजार आवारांवर भव्य लिलाव शेडची उभारणी करून ऐन कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना पिशवी मार्केटच्या माध्यमातून कांदा विक्रीची सुविधा निर्माण करून दिली. तसेच खानगाव नजीक येथे फळे व भाजीपाला लिलाव सुरू करून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला, असे जगताप यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com