ब्लॉक चेन’अंतर्गत साडेसात कोटींचे कर्ज वितरण

वखार महामंडळ, राज्य सहकारी बँकेचा उपक्रम
ब्लॉक चेन’अंतर्गत साडेसात कोटींचे कर्ज वितरण
LoanAgrowon

पुणे ः शेतीमाल काढणी हंगामात (Harvesting Season) बाजारात अचानक आवक (Arrival) होऊन, शेतीमालाचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (Financial Loss) टाळण्यासाठी वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने ‘ब्लॉक चेन’ (Block Chain) तंत्रज्ञानांतर्गत तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल ते २ जून या तीन महिन्यांत ३११ शेतकऱ्यांनी ७ कोटी ४९ लाखांचे कर्ज घेतले आहे, अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.

याबाबत तावरे म्हणाले, की काढणी हंगामात शेतीमालाच्या साठवणुकीतून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वखार महामंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी राज्याच्या विविध शेतीमाल निहाय क्लस्टरमध्ये ब्लॉकचेनद्वारे कर्ज वितरणाची योजना राज्य सहकारी बॅंकेद्वारे योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी १ हजार ५८९ शेतकऱ्यांनी वर्षभरात ३३ कोटी ८६ लाखांचे कर्ज घेतले होते. तर चालू आर्थिक वर्षात गेल्या तीन महिन्यांत ३१० शेतकऱ्यांनी साडेसात कोटींचे कर्ज घेतले आहे.

गेल्या वर्षी या योजनेद्वारे १ हजार ५८९ शेतकऱ्यांनी ९ हजार ४९४ टनांच्या तारणाद्वारे ३३ कोटींचे कर्ज घेतले आहे. तर या वर्षी १ हजार ९३१ टनांच्या तारणातून ७ कोटी ४९ लाखांचे कर्ज घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक हळदीसाठी ४ कोटी ४९ लाखांचे कर्ज तर त्या खालोखाल सोयाबीनसाठी १० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे, असे तावरे यांनी सांगितले.

वखार आपल्या दारी अभियान

शेतकऱ्यांना ब्लॉक चेनद्वारे घरबसल्या मोबाईलवर कर्ज मिळावे, यासाठी वखार महामंडळाने वखार आपल्या दारी हे अभियान गेल्या वर्षी राबविले होते. या अभियानद्वारे राज्याच्या विविध भागांत आणि विशेषतः अन्नधान्याच्या आगारामध्ये शेतकरी मेळावे घेण्यात आले होते. या मेळाव्यांद्वारे शेतकऱ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे तावरे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com