Rabi Crop Competition : रब्बीतील पीक स्पर्धांना नंदुरबारात कमी प्रतिसाद

यंदाच्या रब्बी हंगामापासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा पाच पिकांची निवड केली आहे.
Crop Competition
Crop CompetitionAgrowon

नंदुरबार : जिल्ह्यात रब्बी पीक स्पर्धा (Rabi Crop Competition) होणार आहेत. पण शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद आहे. यात शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) वापर करून अधिकाधिक पिकाचे उत्पादन (0Crop Production घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी रब्बी हंगाम २०२२ पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.

Crop Competition
Rabi Crop Competition : शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पीकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

यंदाच्या रब्बी हंगामापासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा पाच पिकांची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान १ हजार हेक्टर असावे.

Crop Competition
Rabi Crop Competition : शेतकऱ्यांसाठी रब्बी उत्पादन वाढवा स्‍पर्धा

तथापि, संबंधित पिकाखालील क्षेत्र १ हजार हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल. पीक स्पर्धेंचा निकाल तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवडण्यात येईल.

प्रथम वर्षी फक्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा होईल. या पीक स्पर्धेसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकापातळीवर पहिले पाच हजार, दुसरे तीन हजार तर तिसरे तीन हजार रुपयांचे बक्षीस राहील. जिल्हा पातळीवर पहिले दहा हजार, दुसरे सात हजार तर तिसरे बक्षीस पाच हजार रुपये असेल. तसेच, राज्य पातळीवर पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार तर तिसरे ३० हजार रुपये बक्षीस राहील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com