MAGNET Project : ‘मॅग्नेट’मध्ये आंबा, काजू, लिंबू, पडवळाचा समावेश

आशियायी विकास बँकेने अर्थसाह्यित केलेल्या मॅग्नेट प्रकल्पात आणखी चार पिकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये आंबा, काजू, लिंबू आणि पडवळाचा समावेश करण्यात येणार आहे.
Mango Cashew
Mango CashewAgrowon

मुंबई : आशियायी विकास बँकेने अर्थसाह्यित केलेल्या मॅग्नेट प्रकल्पात (MAGNET Project) आणखी चार पिकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये आंबा (Mango), काजू, लिंबू (Lemon) आणि पडवळाचा (Snake Guard) समावेश करण्यात येणार आहे. याआधी डाळिंब, पेरू, चिकू, केळी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची, स्ट्रॉबेरी, सीताफळ आणि फुलांचा या प्रकल्पात समावेश होता. मात्र मोठ्या संख्येने उत्पादित होणारा आंबा आणि काजू यांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमधून मागणी केली जात होती.

Mango Cashew
MAGNET Project : ‘मॅग्नेट’चे आकर्षण

या बाबतचा अभ्यास अहवाल लवकरच सादर केला जाणार असून, आशियायी विकास बँकेच्या शिष्टमंडळाने या चार पिकांच्या समावेशाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. अभ्यास अहवाल सादर झाल्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

Mango Cashew
MAGNET : ‘मॅग्नेट’च्या दुसऱ्या टप्प्यात शेतीमालाच्या प्रक्रियेला स्थान

आशियायी विकास बँकेच्या अर्थसाह्यातून महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाला देण्यात येणारे मध्यस्थी कर्ज अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकरी संस्थांना १५ कोटींपर्यंत कर्ज देण्यात येणार असून, यातून मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निश्‍चित केलेल्या पिकांचा आणि फुलांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला. मात्र कोकणात येणारा हापूस आणि राज्यात अन्य ठिकाणी येणारा केसर आंबा, कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील काजू, पालघर, शहादा येथे मोठ्या प्रमाणात येणारे पडवळ, मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी घेतले जाणारे लिंबू यांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.

त्यामुळे प्रशासनाने या चारही पिकांची माहिती, बियाण्यांपासून ते निर्यातीपर्यंतची साखळीचा अभ्यास केला जाणार आहे. उत्पादित होणारा माल, त्याला उपलब्ध असलेला बाजार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, उपपदार्थ तयार करणे आदींबाबतचा अहवाल तयार केला जाणार असून, तो आशियायी विकास बँकेला सादर केला जाणार आहे.

द्राक्षाचा समावेश करण्यास नकार

सध्या राज्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचाही समावेश मॅग्नेटमध्ये करावा, अशी मागणी केली जात होती. मात्र द्राक्षांची मूल्यवर्धन साखळी विकसित झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षे तयार करण्यापासून ते अन्य बाबींमध्ये द्राक्षाची बाजारपेठ अग्रेसर असल्याने त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com