Mahabeej Seed : ‘महाबीज’चे हरभरा, गव्हाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध

परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अनुदानित दराने बियाणे खरेदी करता यावे यासाठी बियाणे पुरवठा करण्यात आला आहे.
Wheat prices unabated even in export ban
Wheat prices unabated even in export ban Agrowon

परभणी ः महाबीजच्या (Mahabeej) परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission) आणि कृषी उन्नती योजनेअंतर्गत (Krushi Unnati Scheme) ग्रामबीजोत्पदनासाठी (Seed Production) यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी अन्नधान्य, कडधान्य पीकांचे (हरभरा, गहू) प्रमाणित बियाणे अनुदानित दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अनुदानित दराने बियाणे खरेदी करता यावे यासाठी बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून परमीट प्राप्त करून घेणे गरजेचे आहे.

Wheat prices unabated even in export ban
Cotton Seed : कपाशी बियाण्याचे एकरासाठी पाकीट हवे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत हरभऱ्याच्या १० वर्षांच्या आतील राजविजय -२०२, फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी-११०९, बीजीएम-१०२१६ या वाणांसाठी प्रतिक्विटल २ हजार ५०० रुपये तर गव्हाच्या १० वर्षांच्या आतील डीबीडब्ल्यू-१६८, पीडकेव्ही सरदार, फुले समाधान, यूएएसएस-४१८, एमएसीएस -६४७ या वाणांसाठी प्रतिक्विंटल २ हजार रुपये आणि गव्हाच्या १० वर्षांवरील एनआयपीडब्लू-१४५ (फुले नेत्रावती), लोक -१, एमएसीएस-६२२२, एचआय-१५४४ (पुर्णा), जीडब्लू-४९६,एचआय -८६६३(पोषण) या वाणांसाठी प्रतिक्विटंल १ हजार रुपये अनुदान आहे.

Wheat prices unabated even in export ban
Oil Seed Subsidy : ‘गळीतधान्य, तेलबिया’ योजनेचे अनुदान रखडले

कृषी उन्नती योजनेअंतर्गत ग्रामबीजोत्पादनासाठी बियाणे तसेच अन्य निविष्ठा साहित्य अनुदानित दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात हरभऱ्याच्या १० वर्षांआतील राजविजय -२०२, फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी-११०९, बीजीएम-१०२१६ या वाणांसाठी प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपये आणि १० वर्षांवरील दिग्विजय, विजय, जॅकी-९२१८ या वाणांसाठी प्रतिक्विंटल २ हजार रुपये अनुदान आहे.

गव्हाच्या १० वर्षांआतील डीबीडब्ल्यू-१६८, पीडकेव्ही सरदार, फुले समाधान, यूएएसएस-४१८, एमएसीएस -६४७ या वाणांसाठी गव्हाच्या १० वर्षांवरील एनआयपीडब्लू-१४५ (फुले नेत्रावती), लोक -१,एमएसीएस-६२२२, एचआय-१५४४ (पुर्णा), जीडब्लू-४९६, एचआय -८६६३(पोषण) या वाणांसाठी प्रतिक्विटंल १ हजार ५०० रुपये अनुदान आहे, असे कान्हेड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com