‘स्मार्ट’ला गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करा

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

मुंबई : ‘‘शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प (SMART Project) महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,’’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी (ता.७) दिले.

Eknath Shinde
Crop Insurance Scheme : खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्मार्ट’ प्रकल्पाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे (Rural Development) अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. या वेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी, तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘‘स्मार्ट’ प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणांशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबवावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्‍वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’’ डवले यांनी या वेळी प्रकल्पाची माहिती दिली.

‘स्मार्ट’ प्रकल्प राबविल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होईल. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबवावा. या प्रकल्पाला शासन स्तरावरून आवश्यक सर्व मदत करण्यात येईल.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com