Mini Tractor : अनुसूचित, नवबौद्धांच्या बचत गटांना ‘मिनी ट्रॅक्टर’

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहेत.
Agriculture Scheme
Agriculture SchemeAgrowon

सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) वतीने राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या २३ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.

Agriculture Scheme
Tractor Market : 40-50 एचपीच्या ट्रॅक्टरची विक्री का वाढतेय ?

समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी या संबंधीचे आवाहन केले आहे. स्वयं सहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के (कमाल मर्यादा ३.१५ लाख) शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येईल.

Agriculture Scheme
Tractor Market : कोणत्या ट्रॅक्टरची मागणी वाढली ?

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याची कमाल मर्यादा ३.५० लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर लाभ मिळेल.

‘‘जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या विहित नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,’’ असे आवाहन आढे यांनी केले.

लाभासाठी अशा आहेत अटी

बचत गटातील सदस्य राज्याचे रहिवासी असावेत

बचत गटातील ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत

सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत

या आधी या संबंधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com