Gulabrao Patil : स्वच्छता मंत्र्यांचा सरपंचांशी संवाद

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील सरपंचांशी ऑनलाइन संवाद साधला.
Gulabrao Patil
Gulabrao PatilAgrowon

धुळे : स्वच्छ भारत मिशन (Swacha Bharat MIssion) ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ मोहिमेच्या अनुषंगाने नुकतेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज्यातील सरपंचांशी ऑनलाइन संवाद साधला.

Gulabrao Patil
Eknath Shinde : ‘पंचायत राज’मार्फत शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

सरपंचांच्या सक्रिय सहभागातूनच स्वच्छतेत महाराष्ट्र आघाडीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातून ४६ सरपंचांसह तीनशेवर लोकसेवक, अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या संवादात सहभाग नोंदविला.

Gulabrao Patil
Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा‘ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री श्री. पाटील यांनी सरपंचांशी ऑनलाइन संवाद साधला.

Gulabrao Patil
Lumpy Skin : सात जिल्ह्यात शंभर जनावरांचा मृत्यू

धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुसुम निकम यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी ऑनलाइन संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या (स्व.) यशवंतराव चव्हाण सभागृहात ऑनलाइन संवादाची व्यवस्था करण्यात आली होती.

धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे,

महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, मुख्यालेखा व वित्त अधिकारी श्री. गांगुर्डे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सय्यद यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

तसेच धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा येथील पंचायत समिती स्तरावरदेखील सरपंचांना ऑनलाइन संवादात सहभागी होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मंत्री श्री. पाटील यांनी स्वच्छतेत राज्याने केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत सरपंचांच्या पुढाकारातूनच आणि सक्रिय योगदानातूनच महाराष्ट्र अग्रक्रमावर राहील असा आशावाद व्यक्त केला.

सरपंचांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी यावेळी उत्तरे दिली. धुळे जिल्ह्यातून या संवाद कार्यक्रमात हागणदारीमुक्त झालेल्या व होणाऱ्या गावांचे ४६ सरपंच तसेच लोकप्रतिनिधी अधिकारी-कर्मचारी अशा एकूण सुमारे ३०० पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com