Banana : केळीसाठी ‘मनरेगा’ची होणार अंमलबजावणी

केळी पिकासाठी आता ‘मनरेगा’ योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही योजना तत्काळ लागू करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला आहे.
Banana
BananaAgrowon

जळगाव : ‘‘केळी पिकासाठी आता ‘मनरेगा’ योजनेची अंमलबजावणी (MANREGA For Banana Cultivation) करण्यात आली आहे. ही योजना तत्काळ लागू करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला आहे. चालू हंगामात कांदेबाग लागवड (Onion Cultivation) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अध्यादेश फायदेशीर ठरेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,’’ अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

Banana
Banana Rate : नांदेडमध्ये व्यापाऱ्यां‍नी पाडले केळीचे भाव

महाजन म्हणाले, ‘‘जिल्ह्यात केळी पिकाखालील क्षेत्र अंदाजे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. यापूर्वी केळीचा समावेश ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी’ योजनेत होता. परंतु केळी पिकासाठी ‘मनरेगा’ योजनेची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त होते. या बाबत फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. तत्काळ केळी पिकात ‘मनरेगा’ची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागमी केली. त्यानुसार राज्य शासनाच्या नियोजन विभागाने (रोहयो प्रभाग) १० ऑगस्ट २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. यामध्ये केळी लागवडीसाठी सविस्तर अंदाजपत्रक दिले. ही योजना तत्काळ लागू करण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने केळीसाठी ‘मनरेगा’ योजना लागू झाली आहे.’’

Banana
Banana : केळीचे दर पडले की पाडले?

‘‘केळी पिकास प्रतिहेक्‍टरी ३७०४ रोपे, खोड लागवड करून त्याकरिता आवश्यक जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, काटेरी झाडाचे कुंपण करणे, माती व खताच्या मिश्रणाने खड्डे भरणे, रोपे लागवड करणे, खत देणे आंतरमशागत, घड व्यवस्थापन, पीक संरक्षण, पाणी देणे आदींसाठी तीन वर्षांसाठी २ लाख ५६ हजारांचे अनुदान निश्‍चित केले आहे. यामधून ६४८ श्रमिक दिन एवढा रोजगार निर्माण होईल. चालू वर्षी कांदेबागांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा तत्काळ फायदा होईल,’’ असेही महाजन म्हणाले.

‘करपा’साठी तत्काळ कार्यवाही

महाजन म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (कै.) हरिभाऊ जावळे यांनी ज्या पद्धतीने केळी करपा पॅकेज मंजूर केले होते, त्याच पद्धतीने राज्य शासनाकडून तत्काळ केळी करपा पॅकेजचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येईल. त्याला मंजुरी घेण्यात येईल. याकरिता प्रयत्नशील आहे, असे महाजन यांनी सांगितले. यामध्ये शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर करपा नियंत्रणासाठी औषधे निविष्ठा उपलब्ध होतील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com