Micro Irrigation Scheme Subsidy : सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान तातडीने देण्याची मनसेची मागणी

बुलडाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक तसेच तुषार संच घेतले आहेत.
Micro Irrigation
Micro IrrigationAgrowon

Buldana Irrigation Scheme News : बुलडाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक तसेच तुषार संच घेतले आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानाची काही रक्कम अद्यापही मिळालेली नसल्याने तातडीने ती वितरित केली जावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.

Micro Irrigation
Farmer Family Death : वीज कोसळून अख्खं शेतकरी कुटुंबच ठार

याबाबत निवेदनात म्हटले आहे, की शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संचासाठी अर्ज केले होते. त्यांना संमती मिळाल्यानंतर संच विकत घेतले. यासाठी काहींना अनुदानाचे काही हप्ते मिळाले. काही शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाच एकही हप्ता मिळाला नाही.

या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावेत. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, ज्ञानेश्वर कांडेलकर, राजेश काळे, अजय बेलोकार, प्रसिद्धीप्रमुख योगेश सपकाळ, शहराध्यक्ष सागर जगदाळे, निकेतन वाघमारे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com