Crop Insurance : साडेअकरा लाख हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षित

यंदाच्या खरीप हंगामात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ११ लाख ५८ हजार ८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ११ लाख ५८ हजार ८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. यासाठी २२ लाख ९ हजार ७७५ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा १९ जुलै अखेरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ४४.६६ टक्के, तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील ३४.०७ टक्केच शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.

Crop Insurance
PM Kisan: प्रधानमंत्री पीक विमा योजना: बीड पॅटर्न

औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ९४७ शेतकऱ्यांनी ७३७५७ हेक्टर, जालना जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ८२३ शेतकऱ्यांनी ६४ हजार ८२७ हेक्टर क्षेत्र, बीड जिल्ह्यातील ६ लाख ७३ हजार १२३ शेतकऱ्यांनी २ लाख ५२ हजार ३८ हेक्टर क्षेत्र, लातूर जिल्ह्यातील १लाख ६१ हजार ९०८ शेतकऱ्यांनी १ लाख ५ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ लाख १५४ शेतकऱ्यांनी १ लाख ५७ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र, नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ३ हजार ६०८ शेतकऱ्यांनी २ लाख ९८ हजार ३६ हेक्टर क्षेत्र, परभणी जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ५३४ शेतकऱ्यांनी १ लाख ३५ हजार १३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ६७८ शेतकऱ्यांनी ७१ हजार ५७९ हेक्टर क्षेत्रावरीर पिकांचा विमा उतरविला आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वात कमी १६ टक्के, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना प्रत्येकी ३० टक्के, परभणी ३३ टक्के, हिंगोलीत ३५ टक्के, नांदेड ५५ टक्के, तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५७ टक्के शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com