Crop Insurance : विमा भरपाई ठरविण्यासाठी आता उपग्रहाची मदत

शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देण्यासाठी पीक कापणी प्रयोगाबरोबरच आता उपग्रहाच्या माहितीची देखील मदत घेतली जाणार आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

पुणे : शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई (Crop Insurance Compensation) देण्यासाठी पीक कापणी (Crop Harvesting) प्रयोगाबरोबरच आता उपग्रहाच्या माहितीची देखील मदत घेतली जाणार आहे. (satellite help to determine the insurance compensation)

पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ मधील धान, सोयाबीन आणि कापूस या तीन नगदी पिकांच्या लागवडीची उपग्रहाने दिलेली माहिती अधिकृत मानली जाणार आहे. अर्थात, पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षातून मिळालेल्या माहितीला प्राधान्य असेल. मात्र, पीक कापणी प्रयोगातील आकड्यांना ९० टक्के भारांकन आणि उपग्रहाच्या माहितीला १० टक्के भारांकन दिले जाणार आहे.

Crop Insurance
पीकविमा १५ जुलैपासून

पीक कापणी प्रयोगांची संख्या कमी असणे, वशिलेबाजी, गलथानपणा यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असतात. त्यामुळे केंद्राने आता पिकाची माहिती काढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. यात सुदूर संवेदन तंत्रज्ञान, ड्रोन, स्मार्टफोन्स प्रणालीचा समावेश केला गेला आहे.

पीक विम्याच्या कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. त्यामुळे विम्यासाठी पिकाची नोंद केवळ ई-पीक पाहणीच्या नोंदीला महत्त्व दिले गेले आहे. विमा योजनेत नोंदविलेले पीक क्षेत्र व ई-पीक पाहणीतील क्षेत्र यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीची नोंद अंतिम धरली जाणार आहे.

बीड पॅटर्नचा लाभ शेतकऱ्यांना नाही?

पीक विमा योजनेत यंदा बीड पॅटर्नचा अवलंब केला जात असल्यामुळे योजनेची कामे सुटसुटीत व जलदपणे होतील, असा दावा कृषी विभागाने केला आहे. “बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांना लाभ होणार नाही. मात्र, गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्य व केंद्राची शासनाची किमान दोन हजार कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. तसेच, विमा कंपन्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळणार नसल्याने शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नाहक नाकारण्याचे प्रमाण कमी होईल,” असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

अशी घेणार उपग्रहाची मदत

उपग्रहाने दिलेली सर्व माहिती वापरली जाणार नाही. या माहितीच्या निष्कर्षांना १० टक्के भारांकन (वेटेज पॉइंट्स) दिले जातील. म्हणजेच विमा क्षेत्र घटकातील सरासरी उत्पादकता काढण्यासाठी १० टक्के माहिती उपग्रहाची, तर ९० टक्के माहिती पीक कापणी प्रयोगातून घेतली जाईल. तांत्रिक उत्पादन काढताना पीक कापणी प्रयोगातील प्राप्त उत्पादनाच्या ३० टक्के कमी जास्त फरक गृहीत धरण्यास मान्यता दिली गेली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com