Horticulture : रोहयो’तील फळबाग लागवडीतील अडथळे कायम

‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केल्या जाणाऱ्या फळबाग लागवडीतील अडथळे कायम आहेत.
Horticulture
HorticultureAgrowon

नगर ः ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (Employment Guarantee Scheme) केल्या जाणाऱ्या फळबाग लागवडीतील (Orchard Cultivation) अडथळे कायम आहेत. सुधारित मापदंडानुसार आराखड्याला मंजुरी देण्यात त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी मंत्रालयातील रोजगार हमी योजना विभागाने त्रुटी दूर करून प्रस्ताव देण्यात कृषी विभागाला सांगितले असल्याचे ‘रोहयो’ विभागातून सांगण्यात आले. मात्र नेमका फळबाग लागवड करण्याचा कालावधी निघून चालला असल्याने शेतकरी हतबल आहेत.

Horticulture
Horticulture : फळबाग लागवडीची खीळ काढा

शेतकऱ्यांनी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करावी, यासाठी कृषी विभागातून प्रोत्साहन दिले जाते. गतवर्षीप्रमाणे यंदा राज्यात कृषी सहायकांना ‘रोहयो’ लागवड करण्यासाठीचे ‘टार्गेट’ दिले आहे. राज्यात सुमारे साठ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. साधारणपणे जुलै महिन्यातच बहुतांश शेतकरी फळबाग लागवड करण्याला प्राधान्य देतात. यंदा मात्र आतापर्यंत पावसाळ्यातील दोन महिने उलटून गेले असले तरी अजूनही फळबाग लागवड ठप्प आहे.

रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे सुधारित मापदंडानुसार सुधारित खर्चाच्या अंदाजपत्रकाला वरिष्ठ पातळीवर मंजुरी नाही. त्यामुळे फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळणार असले, तरी अंदाजपत्रक करता येत नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेश मिळत नाहीत. यंदा रोजगार हमी योजनेतील मजुरीचे दर वाढले आहेत. पूर्वी २४८ रुपये दर होता. आता तो २५६ रुपये झाला आहे. त्यामुळे नव्या दरानुसार मॉडेल अंदाजपत्रकाला वरिष्ठ पातळीवरून मंजुरी नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर अंदाजपत्रक करता येत नाहीत आणि शेतकऱ्यांना रोपे खरेदी, लागवडीसाठी कार्यारंभ आदेशही देता येत नसल्याची स्थिती आहे.

त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना

सुधारित मापदंडानुसार सुधारित खर्चाच्या अंदाजपत्रकाला मान्यता नसल्याने फळबाग लागवड ठप्प असल्याबाबत मंत्रालयातील रोहयो उपसचिवांशी विचारले असता त्यांनी ‘प्रस्तावात त्रुटी आहेत. दहा टक्के कमी करून प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहेत,’ असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com