Employment Guarantee Scheme : रोजगार हमीतील मजुरांची ऑनलाइन हजेरी

रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाने आता मजुरांची ऑनलाइन हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme Agrowon

जव्हार : तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील अकुशल कामगार (Unskilled Labor) आणि शेतमजुरांना आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये रोजगार हमीच्या (Employment Guarantee) माध्यमातून रोजगार (Employment) पुरवण्यात येत आहे; परंतु केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार रोजगार हमी योजनेतील (employment Guarantee Scheme) २० पेक्षा जास्त मजुरांची संख्या असल्यास ऑनलाइन हजेरी घेतली जाणार आहे. याकरिता दोन वेळा काम करतानाचे फोटो आता अपलोड करावे लागणार आहेत. यामुळे बोगस मजुरांना आणि यंत्रांच्या साह्याने करण्यात येणाऱ्या कामांना पायबंद बसणार आहे.

Employment Guarantee Scheme
Banana : केळीसाठी ‘मनरेगा’ची होणार अंमलबजावणी

रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाने आता मजुरांची ऑनलाइन हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २० पेक्षा जास्त मजूर असणाऱ्या ठिकाणी हा नियम बंधनकारक राहणार आहे. या ठिकाणावरून दोन वेळा ऑनलाइन हजेरी पाठवावी लागेल. यानंतरच मजुरांची मजुरी मिळणार आहे.

Employment Guarantee Scheme
Agriculture Employment : शेतीतला रोजगार का घटला?

प्रत्यक्ष मजूर कामावर आहे की नाही? हे काम कुठे सुरू आहे, तसेच कामाच्या ठिकाणावर जाऊन मजुरांनी होत असलेल्या कामाचे फोटो काढायचे आहेत. याची संपूर्ण माहिती अक्षांश रेखांशमुळे जुळणार आहे. या ठिकाणावरून ऑनलाइन फोटो घेतल्यामुळे कामकाज किती झाले, दिवसभरात किती काम पार पडले याची सगळी माहिती रोहयो कार्यालयाकडे उपलब्ध होणार आहे. दर ८ दिवसांनी ही संपूर्ण माहिती तपासल्यानंतर संबंधित मजुरांच्या खात्यामध्ये मजुरीचे पैसे जमा होणार आहेत.

बोगस मजुरांवर बसणार

अनेक वेळा मशीनच्या मदतीने कामे करून कामावर मजूर असल्याचे दाखविले जात असे. आता काम करणाऱ्या मजुरांचे दिवसातून दोन वेळा फोटो अपलोड केले जाणार आहेत. यामुळे दिवसभरात किती काम पार पाडले आणि दुसऱ्या दिवशी किती काम झाले, याची सर्व माहिती मिळणार आहे. यातून बोगस मजुरांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

नॅशनल मोबाईल सिस्टिमच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतील मजुरांची कामे पारदर्शकतेने पार पडणार आहेत. ज्या कामावर २० पेक्षा जास्त मजूर असतील अशा ठिकाणी सकाळी कामावर रुजू होताच आणि दुपारी मध्यंतरीच्या काळात दोन वेळेस हे फोटो ऑनलाइन पद्धतीने पाठवणे गरजेचे आहे. याबाबत ९ प्रकारच्या यंत्रणांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
किशोर भराडे, अव्वल कारकून, रोजगार हमी योजना, जव्हार तहसील कार्यालय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com