Padalase Irrigation Project: पाडळसे प्रकल्पावर ३० टक्केच निधी खर्च

अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाडळसे प्रकल्पावर आजतागायत अवघा ३० टक्केच निधी खर्च झाला आहे.
Padalase Irrigation Project
Padalase Irrigation ProjectAgrowon

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाडळसे प्रकल्पावर (Padalase Irrigation Project) आजतागायत अवघा ३० टक्केच निधी (Fund) खर्च झाला आहे.

त्यामुळे केंद्राच्या कोणत्याही योजनेत त्याच्या सहभागाची सुतराम शक्यता नाही. सध्या तरी पाडळसेसाठी केंद्राची कवाडे बंदच असल्याचे दिसते.

Padalase Irrigation Project
Irrigation Subsidy : तुषार, ठिबक अनुदानाचे पावणेसात कोटी रुपये थकले

देशभरातील ज्या ज्या राज्यांनी आपापल्या राज्यातील पाणी प्रकल्पांवर ५० ते ७५ टक्के निधी खर्च केला आहे.

मात्र तरीही असे प्रकल्प कोरडेठाकच आहेत आणि राज्य सरकार निधीबाबत कमकुवत ठरत आहे, अशा प्रकल्पांचा केंद्र शासनाने आपल्या बळीराजा, पंतप्रधान कृषी सिंचनासह अन्य योजनांमध्ये सहभाग करून घेतला आहे.

Padalase Irrigation Project
Irrigation Project : आहे कटू तरीही... सिंचन प्रकल्पांबाबत बोलू काही

पाडळसे प्रकल्पावर आजतागायत अवघा ३० टक्केच निधी खर्च झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या कोणत्याही योजनेत त्याच्या सहभागाची सुतराम शक्यता नाही.

देशभरातील ८९ पैकी २६ प्रकल्प राज्यातील आहेत. २६ पैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर काहींचे काम सुरू आहे. ते सर्व पूर्णत्वास आल्यानंतर पाडळसेचा विचार केंद्र करू शकतो.

अनेक वर्षांपासून येथील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पाडळसे प्रकल्पाभोवतीच गिरक्या घालत आहे.

राणा भीमदेवी थाटात प्रकल्प आम्हीच पूर्ण करू, अशा राजकीय वल्गना अपक्षांसह सर्वच पक्षीयांकडून निवडणुकांच्या मोसमात करण्यात येतात. जलसंपदामंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आदी जबाबदार मंडळी पाडळसे पर्यटनाला अधूनमधून येतही असतात.

मात्र २०१४ नंतर या प्रकल्पाचे इंचभरही काम झालेले नाही. त्यामुळे राज्याकडून मिळत असलेला निधी नेमका कुठे मुरतो, हाही संशयाचा आणि संशोधनाचा विषय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com