Crop Insurance : समान विमा हप्त्यासाठी संत्रा संघर्ष समिती देणार लढा

लागवड क्षेत्र अधिक परिणामी भरपाई जास्त द्यावी लागते या कारणामुळे विमा कंपन्यांनी अमरावती, नागपूर जिल्ह्यांत आंबिया बहाराच्या विमा हप्त्यात वाढ केली आहे.
Crop insurance
Crop insuranceAgrowon

अमरावती : लागवड क्षेत्र अधिक परिणामी भरपाई जास्त द्यावी लागते या कारणामुळे विमा कंपन्यांनी (Crop Insurance Company) अमरावती, नागपूर जिल्ह्यांत आंबिया बहाराच्या (Ambiya Bahar) विमा हप्त्यात वाढ केली आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी संत्रा उत्पादक (Orange Farmers) संघर्ष समितीची स्थापना करण्यात केली आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यापैकी सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर २५००० हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्यात असलेस तरी नागपूरला ऑरेंज सिटी अशी ओळख मिळाली आहे. विमा कंपन्यांनी मृग बहराकरिता राज्यातील १३ संत्रा उत्पादक जिल्ह्यांसाठी चार हजार रुपये शेतकरी हिस्सा म्हणून मान्यता दिली आहे.

Crop insurance
Heat Wave: उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी गव्हाची लवकर लागवड

आंबिया बहरासाठी मात्र जिल्हानिहाय वेगवेगळ्या विमा हप्ता आकारला गेला आहे. अमरावती-नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संत्रा लावड असल्याने अमरावती जिल्ह्यासाठी १२०००, तर नागपूर जिल्ह्यासाठी वीस हजार रुपयांचा हप्ता निश्‍चित करण्यात आला आहे. वाशीम १४०००, यवतमाळ १२०००, बुलडाणा ११६००, परभणी ८४०० वर्धा, नगर प्रत्येकी ८०००, अकोला ६०००, बीड, हिंगोली, पुणे प्रत्येकी ४००० याप्रमाणे जिल्हानिहाय्य वेगवेगळ्या विमा हप्ता आकारला जात आहे. मृग बहरात एकसमान विमा हप्ता आकारण्याची पद्धती असताना आंबिया बहारासाठी मात्र वेगळा निकष का, असा प्रश्‍न संत्रा उत्पादक अमरावती व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या विरोधात एकत्र येत संत्रा उत्पादक संघर्ष समितीची स्थापना केली आहे. समितीची पहिली बैठक हिवरखेड येथील तोटे सभागृहात पार पडली.बैठकीला प्रा. संजय पांडव, रूपेश वाळके, हिवरखेड सरपंच विजय पाचारे, नंदकिशोर गांधी, शरणीत राऊत, कांचन कुकडे, सुभाष नागले,

नीलेश कडू, धीरज ठाकरे, रमेश गांधी, देवेंद्र बोर्डे, नरेश वानखडे, अजय रायपुरे, जितेंद्र फुटाणे, वामन ढोमणे, प्रथमेश राऊत, अनिल अमृते, मोहन होले, सुनील सदाफळे, संजीव भोजने, बाळासाहेब भोजने, अरविंद भुते, अशोक गहूकर, कैलास बारस्कर, दिवाकर ठाकरे उपस्थित होते. या वेळी विविध पातळ्यांवर विमा हप्ता एकसमान करण्यासाठी पाठपुराव्याचा निर्णय घेण्यात आला.

अमरावती व नागपूर जिल्ह्यांत संत्रा लागवड क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत आंबिया बहरासाठी विमा हप्त्यात मोठी वाढ कंपन्यांनी केली आहे. हा अन्याय असून, त्या विरोधात लढा देण्यास निर्णय घेण्यात आला आहे.

- रूपेश वाळके,

समन्वयक, संत्रा उत्पादक संघर्ष समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com