
Chhatrapati Sambhajinagar News : शासनाच्या योजनांचे लाभ एकाच छताखाली मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबवण्यात येत आहे.
येत्या शुक्रवारी कन्नडमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनात कोणतीही उणीव राहू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.२२) याबाबतच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री श्री. भूमरे यांनी आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड , कन्नडचे आमदार उदयसिंग राजपुत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना , पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदी उपस्थित होते.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केलेल्या नियोजनाच्या अनुषंगाने सादरीकरणाव्दारे माहिती दिली. श्री. भुमरे म्हणाले, की या उपक्रमामुळे सर्व विभागांना एकाच छताखाली आणून गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे साध्य होणार आहे.
डॉ. कराड यांनी केंद्र शासनाने देखील अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना दिलेला आहे. विशेषत: प्रधानमंत्री स्वनिधी येाजना आणि आयुष्यमान भारत योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामध्ये केंद्राच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी श्री. पांडेय यांनी नियोजनाबाबत माहिती दिली. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जनार्दन विधाते यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे.
ताक आणि मोफत आरोग्य तपासण्या
कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना भोजन, पाणी याबरोबरच उन्हाच्या तीव्रतेमुळे ताक देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिवाय मोफत आरोग्य तपासणी केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी १८ प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत.
कार्यक्रमाच्या दिवशी कन्नड येथील टोल नाका सर्वांसाठी खुला करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.