Fruit planting
Fruit plantingAgrowon

Fruit planting : ‘मनरेगा’अंतर्गत ५७५ हेक्टर फळबाग लागवड

यंदा (२०२२-२३) परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार २२० हेक्टरवर फळबाग-फुलझाडे लागवडीचे उद्दिष्ट आहे.

परभणी ः यंदा (२०२२-२३) परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार २२० हेक्टरवर फळबाग-फुलझाडे लागवडीचे (Fruit planting) उद्दिष्ट आहे. ऑक्टोंबर अखेरपर्यंत ६५५ शेतकऱ्यांनी ५८१.१२ हेक्टरवर लागवड केली. त्यात ५७५ हेक्टरवर फळबाग आणि ५.८० हेक्टरील फुलझाडांचा समावेश आहे. त्यावर २७ लाख ६१ हजार रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Fruit planting
Bhima Sugar Election : भीमा’ वर महाडिकांचेच वर्चस्व

जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यानुसार मनरेगा अंतर्गंत फळबाग तसेच फुलझाडे लागवडीसाठी १ हजार २२० हेक्टर क्षेत्र आहे. या अंतर्गत नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ४ हजार ६१५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार ६८ अर्जाचे सर्वेक्षण झाले. एकूण ४ हजार २९६ शेतकऱ्यांना ३ हजार ९८०.८५ हेक्टरवर लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली.

त्यापैकी ४ हजार ३०३ शेतकऱ्यांना ३ हजार ८१४.९४ हेक्टरवर लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. एकूण ६९५ शेतकऱ्यांनी ६७०.१२ हेक्टरवर लागवडीसाठी खड्डेखोदले आहेत. त्यापैकी ६५५ शेतकऱ्यांनी ५८१.१२ हेक्टरवर विविध फळपिके तसेच फुलझाडांची लागवड केली. त्यात आंबा ३५५.२६ हेक्टर, केळी ६.८० हेक्टर, नारळ ४०.२६ हेक्टर, सीताफळ ६०.८८ हेक्टर, चिक्कू ५.६० हेक्टर, पेरु २१.९५ हेक्टर,मोसंबी ११.७० हेक्टर, संत्रा ४१.१६ हेक्टर, लिंबू २१.७० हेक्टर,इतर फळपीकांची लागवड १०.२१ हेक्टर आहे. फुलझाडांमध्ये मानवत तालुक्यात गुलाब ३.८० हेक्टर, पूर्णा तालुक्यात निशिगंध १.८० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

Fruit planting
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

तालुकानिहाय फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका लक्षांक लागवड क्षेत्र शेतकरी लाभार्थी

परभणी २२० ५०.१० ३२

जिंतूर २२० ११०.६१ १२८

सेलू ११५ ४१.१५ ४४

मानवत ११५ ४५.२० ५१

पाथरी ११० २१.१० २३

सोनपेठ ११० ७३.९० ८१

गंगाखेड ११० १०४.५५ १२८

पालम ११० ८२ १०२

पूर्णा ११० ५२.५१ ६३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com