PM Kisan
PM KisanAgrowon

PM Kisan Scheme : पीएम किसान सन्मान निधी मिळणार पोस्टमनकडून गावातच

पीएम किसान अतंर्गंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपये यानुसार वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते.

Parbhani PM KIsan News : प्रधानमंत्री (पीएम) किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) आजवर लाभार्थीं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १२ हप्ते जमा आले आहे. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना १३ वा हप्ता गावातच पोस्टमनकडून मिळणार आहे.

त्यासाठी लाभार्थ्यांना आधार क्रमांक आयपीपीबी (इंडियन पोस्टल पेमेंट बँक) खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील २४ हजार आणि हिंगोलीतील १५ हजार ९०६ लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न नाहीत.

शुक्रवार (ता.१०)पर्यंत बँक खाते उघडण्याची मोहीम राज्यभर राबविली जात आहे, अशी माहिती पोस्टाच्या परभणी विभागाचे डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी दिली.

PM Kisan
PM Kisan : ‘पीएम किसान’चे प्रलंबित लाभार्थींनी बँक खाते उघडावे

पीएम किसान अतंर्गंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपये यानुसार वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. ही रक्कम डीबीटीद्वारे (थेट लाभ हस्तांतर) लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

आता हा हप्ता उचलण्याची सुविधा पोस्टमनच्या‌ माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात सद्यःस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाहीत.

PM Kisan
Insurance Scheme : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल जाणून घ्या

यात परभणी जिल्ह्यातील २४ हजार आणि हिंगोलीतील १५ हजार ९०६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात १३ व्या हप्त्याची रक्कम जमा होणार नाही.

लाभार्थ्यांना त्यांचे खाते आयपीपीबीमार्फत उघडून ते आधार क्रमांकाशी लिंक करण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. आयपीबीबीतर्फे गावात येऊन ही सेवा देण्यात येणार आहे.

यासोबतच खाते नसणाऱ्यांचे खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते खाते आधार क्रमांकाशी ४८ ते ७२ तासांत जोडले जाईल. शुक्रवार (ता. १०) पर्यंत राबविलेल्या जाणाऱ्या या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

ही आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. पोस्टामध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील टपाल कार्यालयातच उपलब्ध असल्याचे खदीर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com