NHB Subsidy : ‘एनएचबी’ अनुदानासाठी पूर्वसंमतीचा टप्पा रद्द

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे (एनएचबी) अनुदान मिळण्यासाठी पूर्वसंमतीचा टप्पा रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता आधी बॅंकांकडे कर्जाची मागणी करावी लागणार आहे.
NHB Subsidy
NHB SubsidyAgrowon

पुणे ः राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे (National Horticulture Board) (एनएचबी) अनुदान (NHB Subsidy) मिळण्यासाठी पूर्वसंमतीचा टप्पा रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता आधी बॅंकांकडे कर्जाची (Loan Demand) मागणी करावी लागणार आहे. बॅंकेने कर्ज मंजुरीचे पत्र दिले तरच अनुदान प्रस्तावाला ‘एनएचबी’कडून संमती मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

NHB Subsidy
Horticulture : केंद्राच्या लालफितीत अडकले फलोत्पादनाचे मापदंड

एनएचबीचे अनुदान मिळवण्याची पद्धत सोपी व सुटसुटीत करावी, अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. सध्याच्या किचकट पद्धतीमुळे योजना असूनही शेतकऱ्यांना लाभ मात्र मिळत नाही. तसेच, अनुदानासाठी केंद्र शासनाने निधी वाढवून दिलेला असताना प्रत्यक्षात कमी निधी वाटला जातो आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांना एनएचबीचे अनुदान मिळवण्यासाठी आधी एनएचबीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागत होता. या अर्जाची छाननी केल्यानंतर एनएचबीच्या कार्यालयाकडून पूर्वसंमती पत्र (आयपीए) दिले जात होते. शेतकऱ्याला हे पत्र घेऊन पुन्हा बॅंकेकडे जाऊन प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीचा प्रस्ताव द्यावा लागत होता. बॅंके कर्ज मंजुरीचे पत्र दिल्यानंतर बॅंक परस्पर हेच पत्र व प्रस्ताव एनएचबीकडे पाठवत होत्या. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर एनएचबीकडून शेवटी अनुदानाचे संमतीपत्र (जीओसी) दिले जात होते. ही पद्धत क्लिष्ट व वेळखाऊ होती.

NHB Subsidy
Horticulture Program : केंद्राचे फलोत्पादन समूह पडले ‘एकलकोंडे’

‘‘नव्या धोरणानुसार आता शेतकऱ्याला एनएचबीकडे अनुदानासाठी प्रथमतः अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. बॅंकेने कर्ज मंजूर करताच एनएचबीदेखील अनुदानाकरिता संमतीपत्र देईल. त्यामुळे अनुदान मंजुरीच्या कामकाजातील एक टप्पा हटविण्यात आला आहे. हा निर्णय चांगला आहे.

तथापि, बॅंकेने कर्ज मंजूर करण्याचे नाकारले तर शेतकऱ्याला एनएचबीकडे अनुदानासाठी मागणी करताच येणार नाही, असे यातून स्पष्ट होत आहे. छोट्या शेतकऱ्यांना बॅंका अजिबात सहकार्य करीत नाहीत. बॅंकेतील मध्यस्थ किंवा व्यवस्थापकाची मर्जी सांभाळली तरच कर्जाचे प्रस्ताव मंजूर होताच हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे एनएचबीने एक टप्पा हटविला; पण बॅंकांना १०० टक्के कारभारी केले आहे. यामुळे शेतकऱ्याला पुन्हा वाऱ्यावर सोडले आहे,’’ अशी माहिती फलोत्पादन संघटनेशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने दिली.

असे मिळणार एनएचबीचे अनुदान

- प्रकल्प अहवाल तयार करून कर्जासाठी बॅंकेत प्रस्ताव द्यावा लागेल.

- बॅंकेने प्रस्तावाची छाननी करून योग्य वाटला तर कर्ज देण्यास आम्ही तयार असल्याचे बॅंक स्पष्ट करेल.

- बॅंकेने कर्ज मंजुरी पत्र देताच एनएचबीकडे अनुदानासाठी अर्ज करता येईल.

- अर्ज तपासून एनएचबीकडून संमती पत्र दिले जाईल व त्यानंतर प्रकल्पाचे काम शेतकऱ्याला पूर्ण करावे लागेल.

- प्रकल्प पूर्ण होताच अनुदानाची मागणी करणारा

प्रस्ताव बॅंकेमार्फत एनएचबीकडे जाईल.

- प्रस्तावानुसार काम योग्य झाल्याचे तपासून एनएचबीकडून अनुदान रक्कम थेट बॅंकेत जमा होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com