Crop Insurance Scheme : खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमा योजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे. २०२२-२३ मध्ये पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे .
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamity) पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून (Crop Damage) शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमा योजनेत (Crop Insurance scheme) सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे. २०२२-२३ मध्ये पीक विमा योजना बीड पॅटर्न (Crop Insurance Scheme Beed Pattern) (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे . यात विमा कंपनीवर (Insurance Company) नुकसान भरपाईचे जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यन्त असणार आहे. या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. तर नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे .

Crop Insurance Scheme
Crop Insurance : अकोला जिल्ह्यात आता पिकविम्याचा बीड पॅटर्न

योजनेचे उदिदष्टे ः

१) नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे.

२) शेतक-यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.

३) पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

४) कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.

विम्यासाठी पिकांची यादी ः

भात(धान), खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस व कांदा.

शेतकऱ्यांचा सहभाग ः

१) अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील.

२) योजनेत सहभागासाठी अंतिम मुदतः ३१ जुलै २०२२ आहे .

३) जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के आहे.

उंबरठा उत्पादन :

१) अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची ५ वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते .

Crop Insurance Scheme
Crop Insurance : ‘बीड पॅटर्न’ धुमधडाक्यात

विमा संरक्षणाच्या बाबी ः

१) पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट

२) पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान : यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.

३) हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर,पावसातील खंड,दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५०टक्यांहून अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.

४) काढणी पश्चात चक्रीवादळ ,अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते .

५) स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. ( युद्ध आणि अणू युद्धाचे दुष्परिणाम ,हेतू पुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही )

६) ई-पीक पाहणी: शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करावी.विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

Crop Insurance Scheme
पीकविमा १५ जुलैपासून

योजना राबविणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे

अ.क्र.---विमा कंपनी---जिल्हे

१---अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड - -- सोलापूर, जळगाव,सातारा, वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद,भंडारा,पालघर,रायगड यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद,लातूर

२---बजाज अलियंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि.----बीड

३---आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ---परभणी,वर्धा, नागपूर,हिंगोली,अकोला, धुळे,पुणे

४---युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि.---- नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

५---एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि ---नगर,नाशिक, चंद्रपूर, जालना , गोंदिया, कोल्हापूर

शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता हा कापूस व कांदा पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यापैकी जो कमी असेल तो आणि उर्वरित १३ पिकांसाठी तो विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यापैकी जो कमी असेल तो असा निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता यात बदल संभवतो.

खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता.( जिल्हानिहाय फरक संभवतो)

अ.क्र. ---पीक ---सर्वसाधारण विमा संरक्षित रक्कम रु./हे ---शेतकऱ्याने भरावयाचा सर्वसाधारण विमा हप्ता रु./हे ---शेरा

१ ---भात ---४०,००० ते ५१,७६० ---८०० ते १०३६ ---शेतकऱ्याने भरावयाचा सर्वसाधारण विमा हप्ता हा विमा संरक्षित रक्कमेच्या २% किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यापैकी जो कमी असेल तो

२ ---ज्वारी ---२०,००० ते ३२,५०० ---४०० ते ६५०

३ ---बाजरी ---१८,००० ते ३३,९१३ ---३६० ते ६७९

४ --- नाचणी ---१३,७५० ते २०,००० ---२७५ ते ४००

५ ---मका---६००० ते ३५,५९८ ---१२० ते ७१२

६ ---तूर ---२५,००० ते ३६,८०२ ---५०० ते ७३७

७ ---मूग---२०,००० ते २५,८१७ ---४०० ते ५१७

८ ---उडीद ---२०,००० ते २६,०२५ ---४०० ते ५२१

९ ---भुईमूग ---२९,००० ते ४२,९७१ ---५८० ते ८६०

१० ---सोयाबीन ---३१,२५० ते ५७,२६७ ---६२५ ते ११४६

११ ---तीळ ---२२,००० ते २५,००० ---४४० ते ५००

१२ ---कारळे ---१३,७५०---२७५

१३ ---कापूस ---२३,००० ते ५९,९८३ ---११५० ते ३००० ---विमा संरक्षित रक्कमेच्या ५% किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यापैकी जो कमी असेल तो

१४ ---कांदा ---४६,००० ते ८१,४२२ ---२३०० ते ४०७२

विमा नुकसान भरपाईची निश्चिती ः

खरीप २०२२ च्या हंगामात महसूल मंडल/तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना निवडक पिकाचे बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान द्वारे प्राप्त उत्पादनास १० टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास ९० टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे .

उंबरठा उत्पादन - प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन

नुकसान भरपाई रु. = ------------------ ----------------- -X विमा संरक्षित रक्कम रू.

उंबरठा उत्पादन

नुकसान भरपाई मिळण्यासाठी ः

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा ॲप ( crop insurance App), संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे.

अ.क्र.---विमा कंपनी---टोल फ्री क्रमांक

१---अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड---१८००४१९-५००४

२---बजाज अलियंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि.---१८००२०९-५९५९

३---आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.---१८००१०३-७७१२

४---युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि.---१८००२३३ -५५५५

५---एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.---१८००२६६-०७००

संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा केली जाते.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता ः

१) अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.

२) इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक ,आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.

३) कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता www.pmfby.gov.in या पोर्टल वर माहिती उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या नवीन बाबी ः

१) या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल.

२) शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल.म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये वेळीच करावी.

३) या वर्षी काही पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान चा वापर करून येणाऱ्या उत्पादनास १० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनास ९० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क ः संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषी विभाग कार्यालय.

--------------------------------------------------------------------------------------

(लेखक कृषी आयुक्तालय,पुणे येथे मुख्य सांखिक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com