Agricultural Warehouse : गोदाम पावती योजनेचे कामकाज कसे चालते?

गोदाम पावती योजना राबविताना गोदाम कामकाज स्वीकृत कार्यप्रणालीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
Agricultural Warehouse
Agricultural WarehouseAgrowon

Agriculture Warehousing गोदाम पावती योजना (Warehouse Receipt Scheme) राबविताना गोदाम कामकाज (Warehouse operations) स्वीकृत कार्यप्रणालीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रणाली नुसार गोदामविषयक व्यवसायामध्ये गोदाम पावती अदा करताना ती हस्तांतरीय किंवा अहस्तांतरीय स्वरूपात असेल.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वखार पावती किंवा गोदाम पावतीच्या माध्यमातून व्यवहार करताना व गोदाम व्यवस्थापन करताना पुढीलप्रमाणे प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. वखार पावती नमूद केलेल्या पावतीवर कुठल्याही प्रकारची खाडाखोड न होण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे.

१. वखार पावतीतील नमूद केलेल्या पोत्यांची संख्या, वजन व किंमत याच्यावर अडेसिव्ह टेप लावावी.

२. केंद्र प्रमुख ई-वखार पावतीवर कुठेही वाक्यापूर्वी लिहिण्यासाठी जागा ठेवणार नाही.

वखार पावती देण्याचा अधिकार ः

१. वखार केंद्रप्रमुखाने ई-वखार पावती इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये बनवावी.

२. ई-वखार पावती देण्याचा अधिकार असणारा आदेश काढणे आवश्यक असून, त्याची एक प्रत मुख्य अधिकाऱ्याकडे असावी.

३. जर वखार पावती देण्याबद्दल काही सुधारित आदेश काढायचा असेल, तर तशी नोंद मुख्य अधिकाऱ्याने करावी.

४. जर एखादा आदेश न दिलेली किंवा वखार पावती देणारी व्यक्ती अधिकृत नसेल, तर वखार पावती जो देईल तर त्याला अधिकृत पावती देणारा अधिकारी जबाबदार राहील.

Agricultural Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम कामकाज स्वीकृत कार्यप्रणाली

ई -वखार पावती देण्याचे रेकॉर्ड ः वखार केंद्र प्रमुख ई-वखार पावती दिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक फॉर्म केंद्रामध्ये ठेवील.

वखार केंद्रावर साठा ठेवण्यासाठी लागणारे रेकॉर्ड ः

१. गेट रजिस्टर

२ . ठेवीदारांचे अर्ज रजिस्टर

३ . वजनाचे रेकॉर्ड

४ . गोदामातील थप्पीनुसार रजिस्टर

५ . स्टॉक कार्ड

६ . रोजचा आवक-जावक तपशील

७ . साठा साठवणुकीचे रजिस्टर

साठ्याची ओळख ठेवणारे संबंधित रेकॉर्ड ः

१ . प्रत्येक साठ्याची ओळख ठेवण्यासाठी त्याला लॉट नंबर देण्यात येईल. त्याची माहिती ठेवीदाराला देण्यात येईल.

२ . साठ्याला दिलेला लॉट नंबर प्रत्यक्ष कार्डवर व इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये दर्शविण्यात येईल.

३ . प्रमाणित गोदामात ठेवलेल्या प्रत्येक साठ्याला एक ओळख ठेवणारा लॉट नंबर देण्यात येईल, तो ज्या भागात ठेवला असेल त्याप्रमाणे लॉट नंबर असेल.

४ .साठ्याची ओळख ठेवणारा नंबर इलेक्ट्रॉनिक वखार पावतीवर नमूद करावा.

५. केंद्र प्रमुख ठेवीदाराने ठेवलेल्या साठ्याची ओळख ठेवण्यासाठी साठ्यावर स्टॉक कार्ड लावावे.

६. केंद्र प्रमुखाने कुठलाही ओळख नसणारा साठा केंद्रावर साठवू नये.

७. जर ठेवीदाराला त्याच्या पद्धतीने ओळखता येईल असा साठा ठेवायचा असेल, त्याप्रमाणे ठेवीदारात व केंद्र प्रमुखात समन्वय ठेवून नियोजन करावे लागेल.

८. केंद्र प्रमुखाने गोदामात कुणाही बाहेरील व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही याची काळजी घ्यावी.

९. केंद्र प्रमुखाने सर्व साठ्याची व्यवस्थित व योग्य ठिकाणी थप्पी मारून द्यावी.

१०. ज्या साठ्याची आवक जावक लवकर होणार असेल तर तो साठा जास्त दिवस ठेवण्यात येणाऱ्या साठ्याजवळ ठेवू नये.

स्टॉक कार्ड व स्टॉक रजिस्टर ः

१. प्रत्येक गटाला वेगळे स्टॉक कार्ड लावावे.

२. स्टॉक कार्डवर आलेल्या पोत्यांची तारखेसहित नोंद करावी, तसेच साठ्याची प्रत व कीड आढळल्यास त्याची नोंद करावी.

३. सर्व प्रकारच्या नोंदी केलेले स्टॉक कार्ड थप्पीच्या पुढील बाजूस लावावे. त्याच्यावर एक पॉलिथिनचे कव्हर लावावे म्हणजे ते फाटणार नाही. फवारणीच्या वेळी खराब होणार नाही.

४. स्टॉक कार्ड जोवर साठा निर्गमित होत नाही तोवर जपून ठेवावे.

५. गटातून पोत्याची जावक होईल, त्याची स्टॉक कार्डवर नोंद घ्यावी.

वखार केंद्रावरील साठ्याची जावक देण्याची पद्धत ः

वखार केंद्रावरील ठेवीदाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला जावक देताना पुढे नमूद केलेल्या अटींची पूर्तता करावी.

१. वखार केंद्रावरील साठ्याची जावक देताना ठेवीदार खरेदीदाराला जावक देण्याची विनंती अर्ज दाखल करतील.

२. वखार केंद्रावर जावक देण्यापूर्वी कागदपत्रे तपासावीत.

३. वखार केंद्रावर साठ्याची जावक देताना त्याची प्रत तपासावी.

४. केंद्र प्रमुखाने साठा ठेवल्यानंतर जावक देण्यापूर्वी वखारभाडे विम्याचे पैसे प्रथम वसूल करावेत.

५. वखार केंद्रावरून साठा उचल करण्यासाठी अर्ज दाखल करावा.

६. वखार केंद्रावर रिकामा ट्रक जर गरज असेल तर आणावा.

७. वखार केंद्रावर आलेल्या रिकाम्या गाडीचे वजन करावे.

८. रिकामी गाडी वखार वखार केंद्रावर साठा असेल तेथे उभी करावी.

९. गाडी भरल्यावर त्याचे वजन करावे.

१०. गाडी वखार केंद्रावरून बाहेर जाण्यासाठी गेटपास बनवावा.

११. गाडीचे वजन झाल्यावर गेटमधून बाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी.

१२. वखार केंद्रावर साठा जावक झाल्यावर रजिस्टर व तत्सम कागदपत्रांवर नोंद करावी.

वखार केंद्रावर साठा एका ठेवीदाराकडून दुसऱ्याला हस्तांतर करण्यासाठी दोघांची परवानगी लागेल. तसेच वखार केंद्रावर साठा तपासण्यासाठी ठेवीदाराने विनंती केल्यावर त्याच्या समोर साठ्याची तपासणी करावी.

Agricultural Warehouse
Warehouse Scheme : शेतकरी कंपन्यांना गोदाम पावतीआधारे व्यवसाय उभारणी

वखार केंद्रावरील साठा जावक देण्यासाठी वजन करणे ः

वखार केंद्रावरील साठा आवक व जावक देताना वजनाची पद्धत असावी. वखार केंद्रावर साठ्याची जावक होताना साठ्याची गुणवत्ता तपासावी.

१. वखार केंद्रावर साठ्याची जावक होताना ठेवीदार किंवा त्यांचे प्रतिनिधी साठ्याचा नमुना काढून त्याची गुणवत्ता आद्रता व किट तपासू शकतात.

२. वखार केंद्रावर साठा जावक होताना नियमाप्रमाणे तपासणीची पद्धत अवलंबावी.

३. जावक होताना ठेवीदाराने साठा तपासला असेल तशी नोंद वखार केंद्रावर किंवा इलेक्ट्रॉनिक वखार पावतीवर नोंदवावी.

वखार केंद्रावरील साठ्याची जावक घेताना लागणाऱ्या कागद पत्रांची पूर्तता ः

१) गेट रजिस्टर

२) डिलिव्हरी ऑर्डर

३) वजनाचे कागद पत्र

४) जावक देतानाचे वेब्रिज रजिस्टर

५) विमा रजिस्टर

६) थप्पीनिहाय रजिस्टर

७) थप्पीचे स्टॉक कार्ड

८) दररोजचे आवक-जावक रजिस्टर

९) वखार केंद्रावरील वखार पावती देण्याचे व रद्द करण्याचे रजिस्टर

१०) साठ्याचे रजिस्टर

११) ठेवीदाराचे रजिस्टर

१२) वखार पावतीवरील कर्जाचे रजिस्टर

१३) गेट पास

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०, (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com