Crop Insurance : सीताफळाच्या विमाप्रश्र्नी उत्पादक जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

जाफराबाद तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व सीताफळ बागांना पीक विम्याचे कवच मिळावे यासाठी सीताफळ उत्पादक ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या पुढाकारात सोमवारी (ता.१२) जालन्याच्‍या जिल्हाधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

जालना : जाफराबाद तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व सीताफळ बागांना पीक विम्याचे (Custard Apple Crop Insurance) कवच मिळावे यासाठी सीताफळ उत्पादक (Custard Apple Producer) ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या पुढाकारात सोमवारी (ता.१२) जालन्याच्‍या जिल्हाधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहेत.

Crop Insurance
Crop Insurance: उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कसं नमवलं?

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र शुक्रवारी (ता. ९) जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे पार पडले. यावेळी झालेल्या चर्चेत यासह अनेक निर्णय घेण्यात आले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी यावेळी चर्चेस अनेक विषय ठेवले. पैकी सीताफळ पीक विम्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांची जालना येथे भेट तर सीताफळाच्या व्यापार वृद्धीसाठी २७ सप्टेंबर रोजी टेंभुर्णी येथे सीताफळ बागायतदारांच्या बैठकीसह ९ ऑक्टोंबर रोजी सीताफळ कार्यशाळेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सर्वोच्च न्यायालयाची विमा कंपन्यांना तंबी

यावेळी कृषी विज्ञान केंद्र बदनापुरचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ डॉ.दीपक कच्छवे, गृहविज्ञान विषय विशेषज्ञ डॉ. साधना उमरीकर, देऊळगाव राजा कृषी विभागाचे कृषी सहाय्यक विनायक मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. उभयतांनी प्रक्रिया उद्योग, पोषणाचे महत्त्व, गटशेतीचे फायदे, पिढ्या ढेकूण, सेंद्रिय बोंडअळी, कामगंध सापळे आदी बाबत यथायोग्य माहिती देऊन त्याचे महत्त्व विशद केले.

अपेक्षेच्या पुढे लागवड; मात्र विमा कवच नाही

जाफराबाद तालुक्यातील पाच महसूल मंडळापैकी केवळ कुंभारझरी हे एकच महसूल मंडळ विम्यासाठी पात्र आहे. कुठलीही फळबाग २० हेक्टर पर्यंत लागवड केलेली असेल तर त्या फळबागेला विम्याचे कवच देता येते, असा कृषी विभागाचा शासन आदेश म्हणतो. जाफराबाद तालुक्यातील चारही महसूल मंडळात प्रत्येकी २० हेक्‍टरपेक्षा सीताफळाची अधिक लागवड झालेली आहे. परंतु विमा कवच देण्यात आलेले नाही. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे, संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे पाटील म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com