Warehouse Registration : गोदाम नोंदणीसाठी तरतुदी, नियम

वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडे गोदाम नोंदणी करिता विविध तरतुदी अटी व नियम यांची मार्गदर्शक तत्त्वे तयार असून, गोदाम प्रमाणिकरण प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.
warehouse
warehouseAgrowon

वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडे गोदाम नोंदणी (Warehouse Registration) करिता विविध तरतुदी अटी व नियम यांची मार्गदर्शक तत्त्वे तयार असून, गोदाम प्रमाणिकरण प्रक्रिया (Warehouse Verification Process) समजून घेणे आवश्यक आहे.

पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गोदाम नोंदणी

पूर्वी गोदाम नोंदणी कालावधी ३ वर्षांसाठी होता, परंतु गोदाम नोंदणी कायदा २०१७ नुसार ५ वर्षे कालावधीसाठी गोदाम नोंदणी आणि नोंदणी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा ठेव रक्कम भरणे आवश्यक आहे.

व्यवसायाच्या गरजेनुसार व सुरक्षा ठेव जमा करण्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून काही अर्जदारांना ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीकरिता गोदाम नोंदणीची आवश्यकता असते. त्यानुसार ऑनलाइन प्रक्रियेमध्ये आता ६ सप्टेंबर २०१८ पासून अर्जदाराने केलेल्या विनंती अर्जानुसार ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गोदाम नोंदणी व सुरक्षा ठेव भरण्याच्या कालावधीत सूट देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

सुरक्षा ठेवींबाबत शासनाचे नोटिफिकेशन

गोदाम व्यवसायात आर्थिक सुरक्षेची गरज लक्षात घेता ई-एनडब्ल्यूआर (ई- निगोशिएबल वखार पावती)/ ई-एनएनडब्ल्यूआर (ई- नॉन-निगोशिएबल वखार पावती) या बाबी नोंदणीकृत गोदामांमार्फत देण्यात येतात आणि बँकेत तारण ठेवण्यात येतात किंवा ई-एनडब्ल्यूआरचे (ई- निगोशिएबल वखार पावती) बाजारपेठेत व्यवहार केले जातात.

गोदाम नोंदणीच्या अनुषंगाने अर्जदार अथवा गोदामधारक/ गोदामचालक/गोदाम व्यवस्थापक यांच्या सोयीकरिता ६ जुलै २०१७ च्या शासनामार्फत पारितमंजूर करण्यात आलेल्या गॅझेटच्या नोटिफिकेशन व नवीन नोंदणीच्या नियमानुसार सुरक्षा ठेवीची तरतूद करण्यात आली.

warehouse
Agriculture Warehouse : गोदाम पावतीचे नियोजन

३१ जानेवारी २०१९ च्या नवीन नोटिफिकेशन नुसार केलेल्या दुरुस्तीच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीवरील नियंत्रण गतिमान व अधिक परिणामकारक करण्यासाठी सुरक्षा ठेव जमा करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली. त्याकरिता सुरक्षा ठेवीचा नमुना बँक हमी किंवा मुदत ठेवीमध्ये परावर्तित करण्याबाबत तरतूद आहे.

छोट्या गोदामधारकांची गोदामे वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत करण्यास प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने ४ डिसेंबर २०२० मध्ये सुरक्षा ठेव संकल्पनेत पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. सुरक्षा ठेवीच्या गरजेबाबत नवीन नोटिफिकेशनचा तपशील दिलेला आहे.

शेतकरी कंपनी, सहकारी संस्थांना गोदाम प्रमाणिकरण घटकातील सुरक्षा ठेवींबाबत नियम, अटी आणि कागदपत्रे

अर्जदार किंवा गोदामचालक शेतकरी कंपनी अथवा सहकारी संस्था असेल तर एकूण सुरक्षा ठेव रक्कम ५०,००० रुपये प्रति गोदाम.

सुरक्षा ठेव रकमेची पूर्तता ही बँकेची मुदत ठेव किंवा वखार नियामक व प्राधिकरणास बँक पतहमी स्वरूपात देऊ शकतो.

warehouse
Agriculture Warehouse : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापनाचे नियोजन

सुरक्षा ठेव रक्कमेतील बदल श्रेणी सुधारणा प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्राप्त ई-एनडब्ल्यूआर (ई- निगोशिएबल वखार पावती)/ ई-एनएनडब्ल्यूआरच्या (ई- नॉन-निगोशिएबल वखार पावती) धर्तीवर एकूण प्राप्त किमतीच्या प्रमाणात करणे आवश्यक.

नोंदणीनंतरच्या कालावधीत मुदत ठेवीच्या स्वरूपातील सुरक्षा ठेव रक्कम सहा महिन्यांच्या कालावधीत ठेवणे आवश्यक तसेच गतिमान किंवा डायनामिक सुरक्षा ठेव रक्कम प्रत्येक महिन्याच्या शेवटी अपग्रेड किंवा सुधारित करणे आवश्यक.

डायनामिक सुरक्षा ठेव रकमेचा कालावधी किमान सहा महिने असणे अपेक्षित असून, या काळात सुरक्षा रकमेतील बदलांची काळजी घेणे सोईस्कर होईल.

सुरक्षा ठेव रक्कम ही गोदाम नोंदणीचा कालावधी संपणे, रद्द करणे अथवा आत्मसमर्पित करणे अशा परिस्थितीत सहा महिन्यांच्या कालावधीपूर्वी अदा करता येत नाही.

warehouse
Warehouse Registration : गोदाम प्रमाणिकरण नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी नेटवर्थ

राज्यस्तरीय यंत्रणेमार्फत अथवा अशी कोणतीही संस्था, की जी संसदेने अथवा राज्याच्या घटनेनुसार प्रसारित केलेल्या कायद्यानुसार तयार झाली असेल, तर अशा यंत्रणेस सुरक्षा ठेव रक्कम ठेवण्यासाठी इंडिमनिटी बॉण्ड/ नुकसानभरपाई बॉण्ड सादर करणे आवश्यक आहे. हा बॉण्ड प्राधिकरणास सादर करताना सोबत गोदाम नोंदणी बाबत अर्ज, संचालक मंडळाचा ठराव सादर करणे गरजेचे आहे. म्हणजेच शेतकरी कंपनीने किंवा सहकारी संस्थेस ही अट लागू आहे.

२००० टन क्षमता असणाऱ्या गोदामांसाठी

वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत सर्व क्षमता मिळून २००० टन क्षमता असलेल्या गोदामांना ५०,००० रुपये प्रति गोदाम सुरक्षा ठेव तसेच डायनॅमिक किंवा गतिमान सुरक्षा ठेव, मागील महिन्याच्या कोणत्याही दिवसाच्या ई-एनडब्ल्यूआर (ई- निगोशिएबल वखार पावती)/ ई-एनएनडब्ल्यूआरच्या (ई- नॉन-निगोशिएबल वखार पावती) इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक स्वरूपात एकंदर थकबाकीच्या जास्तीत जास्त किमतीच्या ३ टक्के रकमेला किंवा बाबीला T असे संबोधले जाते, हे लेखातील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

लेखातील तक्त्यानुसार अ आणि ब या उभ्या ओळी मिळून वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत सर्व क्षमता मिळून २००० टन क्षमता असलेल्या गोदामांना तक्त्यामधील क नुसार एकूण सुरक्षा ठेव रक्कम लागू असून त्याबाबत तपशील सादर करण्यात येत आहे.

एकूण गोदाम क्षमता (टन) गोदाम व्यवस्थापकांसाठी मुदत सुरक्षा ठेव रक्कम (Fixed Security Deposit)- (अ) गतिमान सुरक्षा ठेव रक्कम (Dynamic Security Deposit)- (ब) एकूण सुरक्षा ठेव रक्कम

(खालील रकमेच्या मर्यादेत) (क)

१०० टन पर्यन्त ५०,००० रु. प्रति गोदाम ------ एकूण रक्कम मर्यादा ५०,००० रूपये

१०१-५०० टन ५०,००० रु. प्रति गोदाम ३ टक्के T एकूण रक्कम मर्यादा २.५० लाख रूपये

५०१-१००० टन ५०,००० रु. प्रति गोदाम ३ टक्के T एकूण रक्कम मर्यादा ५ लाख रूपये

१००१– १५०० टन ५०,००० रु.प्रति गोदाम ३ टक्के T एकूण रक्कम मर्यादा ७.५० लाख रूपये

१५०१-२००० टन ५०,००० रु. प्रति गोदाम ३ टक्के T एकूण रक्कम मर्यादा १० लाख रूपये

२००० टनांपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या गोदामांसाठी

वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत सर्व क्षमता मिळून २००० टन पेक्षा जास्त क्षमता असलेल्या गोदामांना रक्कम एक लाख रुपये प्रति गोदाम सुरक्षा ठेव (तक्यातील z नुसार) तसेच डायनॅमिक किंवा गतिमान सुरक्षा ठेव, मागील महिन्याच्या कोणत्याही दिवसाच्या ई-एनडब्ल्यूआर (ई- निगोशिएबल वखार पावती)/ ई-एनएनडब्ल्यूआरच्या (ई- नॉन-निगोशिएबल वखार पावती) इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिक स्वरूपात एकंदर थकबाकीच्या जास्तीत जास्त किमतीच्या ३ टक्के रकमेला किंवा बाबीला T असे संबोधले जाते, हे खालील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

खालील तक्त्यानुसार x, y आणि z असे मिळून वखार विकास व नियामक प्राधिकरणांतर्गत नोंदणीकृत सर्व क्षमता मिळून २००० टन पेक्षा जास्त क्षमता असलेल्या गोदामांना तक्त्यानुसार एकूण सुरक्षा ठेव रक्कम लागू असून त्याबाबत तपशील सादर करण्यात येत आहे.

स्तर X Y Z

T नुसार अपेक्षित रकमेच्या कमी किंवा २५ कोटी रकमेच्या समप्रमाणात ० ३ टक्के T एकूण रक्कम १ लाख रूपये प्रति गोदाम

T नुसार अपेक्षित रक्कम २५ कोटी रकमेपेक्षा जास्त किंवा २५० कोटी पर्यन्त ७५ लाख रूपये रुपये २५ कोटीवर T च्या १.५ टक्के पेक्षा जास्त एकूण रक्कम १ लाख रूपये प्रति गोदाम

T नुसार अपेक्षित रक्कम २५० कोटी रकमेपेक्षा जास्त किंवा २५०० कोटी पर्यन्त ४.१२५ कोटी रूपये रुपये २५० कोटीवर T च्या १ टक्के पेक्षा जास्त एकूण रक्कम १ लाख रूपये प्रति गोदाम

T नुसार अपेक्षित रक्कम २५०० कोटी पेक्षा जास्त २६.६२५ कोटी रूपये रुपये २५०० कोटीवर T च्या ०.५ टक्के पेक्षा जास्त एकूण रक्कम १ लाख रूपये प्रति गोदाम

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com