Solar Agriculture Pump : कोल्हापुरात ‘सौर कृषी वाहिनी’बाबत जनजागृती

Electricity Supply : शेतीला दिवसा वीजपुरवठा व्हावा, या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येतो आहे.
Solar Agriculture Pump
Solar Agriculture PumpAgrowon

Kolhapur Electricity Supply : शेतीला दिवसा वीजपुरवठा व्हावा, या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येतो आहे. शेतीचा अधिक वीज भार असलेल्या विद्युत उपकेंद्र परिसरातील ५ किलोमीटर परिघात सौर प्रकल्प उभा करण्यात येणार आहेत.

या योजनेचे महत्त्व पटवून देऊन सौर प्रकल्पासाठी जमीन उपलब्धतेकरिता महावितरणची यंत्रणा सरसावली आहे.

Solar Agriculture Pump
Solar Agriculture Scheme : आठ गावांतील दोन हजार शेतकऱ्यांना ‘सौर कनेक्शन’

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १०३ उपकेंद्रांवरील शेती विद्युत वाहिन्या सौरवर आणण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी संवाद सत्र गतीमान केले आहे.

कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायतींना भेटी देऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेबाबत चर्चा, जाणिव-जागृती करीत आहेत. लोकप्रतिनिधी, महसूल विभाग यांच्याशी समन्वय साधत आहेत.

या अंतर्गत कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी परिते ग्रामपंचायतीस भेट देऊन सरपंच शमनोज पाटील, सदस्य शहाजी पवते, जयंत नेमाने आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी उपविभागीय अभियंता परिक्षित उदगावे, शाखा अभियंता अमित नकाते यांची उपस्थिती होती.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ यांनी कबनूर ग्रामपंचयातीत बैठक घेऊन योजनेबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी सरंपच शोभा पोवार, उपसरपंच सुनील कडप्पा यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com