पुरंदरमध्ये ‘अटल भूजल’योजनेची कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती

पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळ पडत असून तालुक्यातील बहुतेक गावांतील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
Water scheme
Water schemeAgrowon

सासवड : पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळ (Drought) पडत असून तालुक्यातील बहुतेक गावांतील पाणीपातळीत (Water Level) मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भूजल सर्वेक्षण (Ground Water Survey) आणि विकास यंत्रणेमार्फत तालुक्यामधील ३६ गावांमध्ये अटल भूजल योजना (Ground Water Scheme) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जलसुरक्षा (Water Security) आराखडा तयार करण्यात येऊन विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कलापथकाची निर्मिती केली असून कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

Water scheme
Water Management : पाऊस पाण्याचे योग्य नियोजन

पुरंदरमधील माळशिरस, हिवरे व दिवे ग्रामपंचायतींमध्ये जय मल्हार कलामंच या कला पथकामार्फत २५ ते २७ जुलै या कालावधीत जनजागृतीबाबत कार्यक्रम घेण्यात आले. सदर गावांमध्ये भूजल पातळी कमी झाल्यामुळे या गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात येऊन विविध उपाययोजना घेण्यात आल्या. मल्हार कलामंच पुणे या कलापथकामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात आले.

Water scheme
Water Pollution: जलप्रदूषणामुळे पंजाबला शंभर कोटींचा दंड

मनोरंजन आणि वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून अटल भूजल योजना, भूजल बचतीचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व, विहीर पुनर्भरण, ठिबक व तुषार सिंचन, भूजल पातळीच्या घसरणीत सुधारणा करणे, ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागाच्या योजनांच्या अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे व जलसुरक्षा आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच भूजल पातळी इत्यादीबाबत जनजागृती करण्यात आली.

वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे व सहायक भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या शुभांगी काळे, दर्शन साठे व राकेश देशमुख यांच्या सहकार्यातून पथनाट्याद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिंना भूजल पातळीबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com