Employment Guarantee Scheme : सांगलीत ‘रोहयो’ची सार्वजनिक कामे ठप्प

गावातील शाळेचे क्रीडांगण, कंपाऊंड, संरक्षण भिंती, शौचालय या कामांचा नव्याने समावेश केला.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee SchemeAgrowon

Rojagar hami Yojana : सांगलीत रोजगार हमी योजनेतील (Emplyment Guarantee Scheme) सार्वजनिक कामांवर दिवसातून दोन वेळा ऑनलाइन हजेरीच्या जाचक अध्यादेशामुळे तालुक्यासह जिल्ह्यात ‘रोहयो’ची सार्वजनिक कामे गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाली आहेत.

रोजगार हमी योजना केंद्र आणि राज्य सरकार (Central, State Government) यांच्या संयुक्तपणे देशभर राबवली जाते. गेल्या वीस वर्षांपासून योजनेत आवश्यकतेनुसार बदल केले. नव्याने अनेक नवीन कामांचा योजनेत समावेश केला आहे.

गावगाड्यातील सार्वजनिक कामाबरोबरच शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या दृष्टिने शेतीशी निगडित वैयक्तिक कामांची संख्याही वाढवली. त्याचे अनेक सकारात्मक परिणाम समोर आलेत. अनेक विकासकामांना रोजगार हमीशी सांगड घातली.

गावातील शाळेचे क्रीडांगण, कंपाऊंड, संरक्षण भिंती, शौचालय या कामांचा नव्याने समावेश केला. शेतकऱ्यांनी विहीर खुदाईपासून वैयक्तिक फळबाग लागवड आदी कामे ‘रोहयो’तून केलीत. केंद्र शासनाने ‘रोहयो’वरील अर्थसंकल्पातील तरतूद १८ टक्क्यांनी कमी केली आहे.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहरींची कामे

ग्रामीण भागात ‘रोहयो’ची कामेच होणार नाहीत या दृष्टिने जाचक अटी लावल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सहा हजार कोटींची तरतूद केली आहे. गत वेळी ती सात हजार कोटींवर होती.

रोजगार हमीच्या निधीला अर्थसंकल्पात कात्री लावत असतानाच तरतूद केलेला निधीही खर्च होणार नाही, याची दक्षतादेखील घेतली आहे. गेल्या महिन्यापासून हमीच्या कामाची हजेरी दिवसातून सकाळी दहा आणि दुपारी तीन वाजता अशी दोन वेळा ऑनलाइन घेण्याचा अध्यादेश काढला आहे.

परिणामी जाचक अटीमुळे गावातील कामे बंद पडली आहेत. सार्वजनिक कामांत खडीकरणाचे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षाची लागवड कामांचा समावेश होतो.

कामावरील मजुरांची हजेरी घेण्यासाठी २० मजुरांमागे एक रोजगार मित्र नेमण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप नेमणुकाच केलेल्या नाहीत.

Employment Guarantee Scheme
Agriculture Economy : बिगर शेती रोजगार वाढवण्याची गरज

वैयक्तिक कामांना सार्वजनिक म्हणून मंजुरी

अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कामांना प्रशासनाने मंजुरी देताना सार्वजनिक म्हणून मंजुरी दिल्या आहेत. यात फळबाग लागवड, विहीर खुदाई, सीताफळ लागवड, शेततळे आदींचा समावेश आहे. ही अनेक कामे अर्ध्यावर आली आहेत;

मात्र शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे ही कामेसुद्धा अडचणीत सापडली आहेत. सार्वजनिक कामांमध्ये वैयक्तिक कामांचा समावेश केल्यामुळे त्यांची ऑनलाइन हजेरी घ्यावी लागत आहे. त्यामुळे तीही कामे बंद पडली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com