Antyodaya Scheme : सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून चपाती कमी

शासनाने रेशन दुकानात मिळणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांच्या गव्हाच्या प्रमाणात कपात केली. सध्या रेशन दुकानातून एक किलो गहू व चार किलो तांदूळ देण्यात येत आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon

अचलपूर, जि. अमरावती : (Amaravati Ration Shop) मागील तीन महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी झाली आहे. शासनाने रेशन दुकानात (Ration Shop) मिळणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांच्या (Antyodaya Scheme) गव्हाच्या प्रमाणात (wheat) कपात केली. सध्या रेशन दुकानातून एक किलो गहू व चार किलो तांदूळ देण्यात येत आहे.

Ration Shop
Ration Shops : रेशन दुकानांना ‘कार्पोरेट लूक’

मात्र एक किलो गव्हात कुटुंबाचे पोट भरायचे कसे, असा प्रश्‍न उभा ठाकल्याने तांदूळ विकून गहू आणले तर यात गैर काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. सर्वसामान्य जनतेला खुल्या बाजारातून गहू खरेदी करणे परवडत नाही. अशा व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय लाभदायक ठरतो.

Ration Shop
Crop Damage : मूग, उडदाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली

परंतु आता पुरवठा विभागाने रेशनवरील गहू कमी करून त्याऐवजी तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तीन महिन्यांपूर्वी रेशन दुकानात प्रति कुटुंब तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जात होता. मात्र आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्यात येत आहे.

Ration Shop
Crop Damage Survey : सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

त्यामुळे की काय, गोरगरीब जनता तांदूळ विकून गहू विकत आणत आहे. मात्र प्रशासन तांदूळ विकत घेणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी तांदूळ विकत घेण्यासाठी नकार देत आहेत.

मात्र शहरातील अवैद्य व्यापारी मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ कमी भावात खरेदी करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे शासन गव्हाचे वाटप कमी करते. तर दुसरीकडे तांदूळ विकून गहू आणू देत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने फक्त तांदूळ खायचे काय, चपाती खाण्याचा गोरगरिबांना अधिकार नाही काय, असे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.

सणासुदीला तांदळापेक्षा गव्हाची गरज सर्वसामान्यांना रेशनवर मिळणाऱ्या गव्हाला कात्री लावली आहे. तर तांदूळ अधिक देत आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या ताटातील चपाती कमी झाली आहे. तर दुसरीकडे प्रत्येकी चार किलो तांदूळ देत असल्याने प्रत्येक कुटुंबाकडे दर महिन्याला तांदूळ शिल्लक राहत आहे.

सणासुदीच्या दिवसांत रेशनधारकांना तांदळापेक्षा गव्हाची गरज असते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशी उत्पादक भागांत आम्ही फरदड निर्मूलनाची मोठी मोहीम राबविली आहे. त्याला चांगले यश आले आहे.

- विकास पाटील, पुरवठा अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com