Jaljeevan Mission : ‘जलजीवन’मधून प्रत्येक घरात पाणी देण्याचा संकल्प

‘‘कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद वाढवून लाभाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी काम करावे. ‘जलजीवन मिशन योजने’अंतर्गत प्रत्येक घरात माणशी ५५ लिटर पाणी देण्यात येईल."
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. नगर : ‘‘केंद्र सरकारने पाण्याची उपलब्धता (Water Availability) करण्यासाठी नदीजोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे."

"त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची संकल्पना असलेल्या केंद्र सरकारच्या ‘जलजीवन मिशन योजने’ (Jaljeevan Mission Scheme) अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाचे पाणी दिले जाईल आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल (Pralhad Singh Patel) यांनी केले.

टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे आयोजित भाजपच्या संघटनात्मक बूथ समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

पटेल म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद वाढवून लाभाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी काम करावे. ‘जलजीवन मिशन योजने’अंतर्गत प्रत्येक घरात माणशी ५५ लिटर पाणी देण्यात येईल."

"जगातील लोकसंख्येच्या १८ टक्के लोकसंख्या आपली आहे. त्यामानाने चार टक्के एवढेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नदीजोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.’’

‘‘पाण्याच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व असून, भविष्यात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुन्हा वापर करावा लागेल,’’ असेही पटेल म्हणाले.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील भाजपच्या कामाचा आढावा मांडला.

जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, प्रकाश चित्ते, माजी सभापती नानासाहेब पवार, शरद नवले, बबनराव मुठे, नानासाहेब शिंदे, विठ्ठलराव राऊत, गिरिधर आसने, भाऊसाहेब पवार, राहुल पटारे, अविनाश लोखंडे, कृष्णा वेताळ उपस्थित होते.

Jaljeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन मिशन’ची कामे वेळेत पूर्ण करा

‘नागरिकांशी संवाद साधा’

‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या लाभाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्य करावे. बूथ कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधावा,’’ असा सल्ला पटेल यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com