Galyukt Shiwar Scheme : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला प्रतिसाद

Galmukt Dharan Yojana: भारतीय जैन संघटनेच्या शासनाच्या मदतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविली जात आहे.
Galyukta Shiwar Scheme
Galyukta Shiwar Scheme Agrowon

Dhule News : भारतीय जैन संघटनेच्या शासनाच्या मदतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविली जात आहे.

यात जैन संघटना ही प्रचार रथाच्या माध्यमाने गावातील तलावाचा गाळ काढण्यासाठी गावाची मागणी सरपंच किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून घेत आहे. याला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या प्रचार रथासाठी माजी गटनेते अनिल वानखेडे व संघटनेची शिंदखेडा शाखेचे आर्थिक सहकार्य मिळत आहे. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. चंद्रकांत डागा यांनी गावागावांत जाऊन ३३ गावांचा अर्ज भरून घेतला

मागणी अर्ज देणारी गावे अशी : तावखेडे, दभाशी, वर्षी, प्रिंप्राड, म्हळसर, चिरने, कदाने, खलाने, चिमठाने, मेथी, भडने, शेवाडे, तामथरे, आरावे, अमराळे, चिमठावळ, वाडी, देवी, सतारे, देगाव, खरदे बु., अंजन विहीर, वरझडी, हातनूर, सोनशैलू, विखरण, सूराय, कर्ले, परसोळे, नवे कोळदे, दलवाडे (प्र.न.), वरुळ, चौगाव.

Galyukta Shiwar Scheme
Galyukt Shiwar Yojana : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानाला प्रारंभ

म्हळसर, चिमठाने, शेवाडे, आरावे, तामथरे, परसोवेळे या गावांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे. राहिलेल्या गावांनी लवकर ऑनलाइन अर्ज भरावा. ज्यांनी भरला नसेल त्यांच्या ऑनलाइन अर्ज संघटनेचे जिल्हा समन्वयक अविनाश मराठे हे भरतील. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर सर्व

अर्जांची हार्ड कॉपी ही जल संधारण विभागाकडे देण्यात येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया ते करतील. इतर गावांनी ही या योजनेचा फायदा घेण्याचे प्रा. डागा यांनी आवाहन केले.

मागणी अर्ज देणारी गावे अशी...

तावखेडे, दभाशी, वर्षी, प्रिंप्राड, म्हळसर, चिरने, कदाने, खलाने, चिमठाने, मेथी, भडने, शेवाडे, तामथरे, आरावे, अमराळे, चिमठावळ, वाडी, देवी, सतारे, देगाव, खरदे बु., अंजन विहीर, वरझडी, हातनूर, सोनशैलू, विखरण, सूराय, कर्ले, परसोळे, नवे कोळदे, दलवाडे (प्र.न.),वरुळ, चौगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com