
Jaljeevan Mission Nagar : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले ‘जलजीवन मिशन’ हे एक क्रांतिकारी पाऊल असून, तालुक्यात या योजनेसाठी (Water Scheme) ७५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Minister Radhakrishna Vikhe) पाटील यांनी दिली.
‘जलजीवन मिशन’अंतर्गत आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला.
या वेळी राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थींना साधन साहित्याचे वितरण आणि अचानक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना मोफत अपघात विमा योजनेच्या माध्यमातून धनादेश देण्यात आले.
विखे पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ग्रामीण भागात विकास साध्य करताना पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला चालना देण्यासाठी अर्थ संकल्पात २० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने ग्रामीण भागात कृषिपूरक व्यवसायातून मोठे रोजगार निर्माण होतील.
अशी अपेक्षा व्यक्त करून सेवा सहकारी सोसायट्यांना सुद्धा मल्टिर्पपजचा दर्जा देण्याचा निर्णय सहकारातून रोजगार निर्मितीला उपयुक्त करणार आहे. महसूल विभागाने सलोखा योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद बांधावर मिटविण्याची मोठी मोहीम हाती घेतली.
वर्षानुवर्षे चालणारे वाद सलोखा योजनेतून मिटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करतानाच दुग्ध व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी राज्यात दुधाळ जनावारांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.