करईडला एकरी २२०० रुपये अनुदान देण्याच्या हालचाली

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जमा करण्यास प्रारंभ
करईडला एकरी २२०० रुपये अनुदान देण्याच्या हालचाली
Safflower Agrowon

अकोला ः नागपूर येथील महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्थेमार्फत या रब्बी हंगामात विदर्भात आठ जिल्ह्यांत राबवलेल्या करडई प्रकल्पातील सहभागी शेतकऱ्यांना अखेर एकरी २२०० रुपये देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या शेतकऱ्यांकडून नॉनक्रिमिलेअर गोळा केले जात असून, येत्या काळात ही रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे समजते. ‘ॲग्रोवन’ने ५ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रकाशित करून याकडे लक्ष वेधले होते.

या रब्बी हंगामात (Rabi Season) तेलबिया (Oil Seed) (करडई) उत्पादन, प्रक्रिया व विक्री कार्यक्रम राबवण्यात आला. महाज्योतीमार्फत (Mahajyoti) राबवलेल्या या प्रकल्पात सुरुवातीला शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिल्या गेली. शेतकऱ्याने पिकवलेली करडई (Safflower) परत विकत घेतली जाईल. यंत्राने कापणी केली जाईल. त्यावर प्रक्रिया करून तेल काढण्यात येईल. त्यातून जो काही निव्वळ नफा येईल त्याचा वाटा उत्पादक शेतकऱ्याला मिळेल, लागवडीसाठी बियाणे, प्रोत्साहन म्हणून एकरी २२०० रुपये अशी अनेक आश्‍वासने देण्यात आली. यापैकी बियाणे वगळता अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. याबाबत सर्वच स्तरातून मागणी सुरू झाल्याने अखेरीस हा निधी देण्याबाबत संचालक मंडळाचा निर्णय झाल्याचे समजते.

Safflower
करडई काढणीसाठी कंबाईन हार्वेस्टर

शासनाच्या खाद्यतेल धोरणाला अनुसरून महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील शेतकऱ्यांसाठी हा करडई उत्पादनाचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्यासाठी अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे तीन क्लस्टर तयार करण्यात आले. याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन केंद्राने तांत्रिक मार्गदर्शन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात ८०० एकरांसाठी बियाणे वाटप केल्याचा दावा केला जातो. त्यापैकी सहाशे एकरांवर लागवड झाली. यातील काही शेतकऱ्यांचे बियाणे अतिशय विरळ उगवले. त्यामागे शेतकऱ्यांनी खोलवर पेरणी केल्याचे कारण दिले जात आहे. आता हंगाम संपला तरी अकोला जिल्ह्यात करडईचे अंतिम क्षेत्र किती होते, त्यातून किती उत्पादन झाले, याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

विक्री व्यवस्था करून दिल्याचा दावा

करडई काढल्यानंतर ती परत घेण्याचे आश्‍वासन महाज्योतीतर्फे करण्यात आले होते. मात्र याबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. काही शेतकऱ्यांची करडई विक्री करून दिल्याचा दावा यंत्रणातून केला जात आहे. यात वाशीम जिल्ह्यातील एका शेतकरी उत्पादक कंपनीला २०० क्विंटल व हिंगोलीमधील एका कंपनीला २५० क्विंटल करडई दिल्या गेली. या मालाला ५००० ते ५५०० दरम्यान दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com