Government Scheme : वैयक्तिक लाभाच्या साडेतीनशे प्रकरणांना मंजुरी

संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १९२ पैकी १५६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची १४७ पैकी १३१ प्रकरणे, श्रावणबाळ योजनेअंतर्गत १६३ पैकी ५७, अशी एकूण ३४४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
Government Scheme
Government Scheme Agrowon

नगर ः संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत (Sanjay Gandhi Niradhar Yojna) १९२ पैकी १५६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची (Indira Gandhi Old Age Scheme) १४७ पैकी १३१ प्रकरणे, श्रावणबाळ योजनेअंतर्गत १६३ पैकी ५७, अशी एकूण ३४४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

Government Scheme
Weed Management : तण व्यवस्थापनामधील काही नवीन विचार

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने तालुक्यातील योग्य लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही प्रकरणे मंजूर करण्यात आली. उर्वरित १५८ प्रकरणांत किरकोळ त्रुटी आढळल्या असून, त्या सुधारून ही प्रकरणे पुन्हा तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील पायाभूत सुविधांसह शैक्षणिक सुविधा, आर्थिक समृद्धी, सुरक्षित व शांततामय वातावरण निर्माण झाले आहे. इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी यशोधनचे जनसेवक व कार्यालय काम करीत आहे.

तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना याचा लाभ मिळत असून, या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज यशोधन कार्यालयातील जनसेवक किंवा सेतू कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com