Irrigation Scheme : ‘पाडळसे सिंचन’साठी वाळू मिळेना

पाडळसे प्रकल्पाचे काम वाळू उपलब्ध नसल्याने रखडले आहे. नाशिक कार्यालयाने निम्न तापी प्रकल्प विभाग अमळनेर कार्यालयाला याबाबतचे पुढील नवे डिझाईन व कामासंदर्भातील योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
Takari Irrigation Scheme
Takari Irrigation SchemeAgrowon

अमळनेर, जि. जळगाव : पाडळसे प्रकल्पाचे (Padlase Irrigation Project) काम वाळू उपलब्ध नसल्याने रखडले आहे. नाशिक कार्यालयाने निम्न तापी प्रकल्प (Tapi Project) विभाग अमळनेर कार्यालयाला याबाबतचे पुढील नवे डिझाईन व कामासंदर्भातील योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

यानुसार सुरुवातीला कटिंगचे काम करण्यात आले. मात्र वाळूची उपलब्धता नसल्याने काम खोळंबले आहे. राज्य सरकारचे नवे वाळू धोरण (Sand Policy) निश्‍चित झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामासाठी वाळू उपलब्ध होईल व काम सुरू होईल.

Takari Irrigation Scheme
Rabi Irrigation : रब्बी हंगामासाठी टेंभूचे आवर्तन सुरू

तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ई. शं. पढार यांनी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला. आयआयटी मुंबईचे डॉ. आर. एस. जांगीड यांनी सादर केलेल्या वस्तुनिष्ठ अहवालातील निष्कर्षानुसार प्रस्तंभातील सविस्तर संकल्पन नाशिकच्या ‘मेरी’कडून मिळण्यास व याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, अशी शासनास विनंती केली होती.

यानंतर जलसंपदामंत्र्यांनी पाडळसे प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पांतर्गत संकल्पनात्मक बाबी संदर्भात एका महिन्याच्या आत निर्णय घेऊन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात प्रकल्पस्थळी आदेश दिले होते. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी विनंती पढार यांनी केली होती.

Takari Irrigation Scheme
Rabi Irrigation : दोन महिन्यांत वीस टीएमसी पाण्याचा वापर

वस्तुनिष्ठ अहवालातील निष्कर्षांतर्गत प्रस्तंभाच्या पायापासून ते माथा लेवल (१३९.२४ मी. पर्यंत लोहसळींची अतिरिक्त तिसरी रांग देण्याची आवश्यकता नाही. प्रस्तंभाच्या उर्वरित भागासाठी पुरेशी गाभ्याची लांबी देऊन संकल्पनातील आवश्यकतेनुसार लोह द्यावे व त्यानुसार पुढील बांधकाम करावे, असे नमूद केले आहे.

त्यानंतर नवे डिझाईन तयार केले व त्यास मंजुरीही मिळवली. पुढील कामासंदर्भात योग्य त्या सूचनाही तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाला देण्यात आल्या.

नाशिक कार्यालयाकडून पुढील नवे डिझाईन व बांधकामाबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, सेंट्रिंग आदी सर्व साहित्य व यंत्रणा आपल्याकडे आहे. मात्र वाळूची उपलब्धता नसल्याने काम थांबले आहे. वाळू उपलब्ध झाल्यानंतर कामाला गती दिली जाईल.

- मुकुंद चौधरी,

कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प विभाग, अमळनेर (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com