Sandalwood: दिल्लीत १० हजार चंदनाची झाडे लावा; नायब राज्यपालांचा फतवा

राजा बोले आणि दल हाले, असं म्हणतात. दिल्लीचे नायब राज्यपाल वी के सक्सेना (V K Saxsena) यांनी ही उक्ती खरी करण्याचा चंग बांधलाय. देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीमध्ये (Delhi) १० हजार चंदनाची झाडं लावण्यांचं फर्मान त्यांनी सोडलंय. Sandalwood Farming
V K Saxsena
V K SaxsenaAgrowon

राजा बोले आणि दल हाले, असं म्हणतात. दिल्लीचे नायब राज्यपाल वी के सक्सेना (V K Saxsena) यांनी ही उक्ती खरी करण्याचा चंग बांधलाय. देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीमध्ये (Delhi) १० हजार चंदनाची झाडं लावण्यांचं फर्मान त्यांनी सोडलंय. तसा लेखी आदेशच त्यांनी जारी केलाय. त्यानुसार दिल्लीतील बागा, उद्याने आणि खुल्या जागेवर चंदनाची झाडे लावण्यात येणार आहेत. राज्यपालांनी सुंदर नर्सरीला (Sunder nursery) भेट दिल्यानंतर रविवारी (ता. ३) याबाबतचे आदेश दिले.

चंदनाच्या लागवडीतून सरकारी जमिनीवरही उत्पन्न मिळेल. आणि शहरातील जमीनधारक आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक संपत्ती निर्माण होईल. चंदनाचे झाड १२ ते १५ वर्षात विकण्यायोग्य होते. त्याला १२ ते १५ लाख रुपये प्रति झाड असा दर मिळतो, असे दावे सक्सेना यांनी केले आहेत. त्यांच्या मते १० हजार चंदनाच्या झाडांपासून १२ ते १५ हजार कोटीचे उत्पन्न मिळू शकेल.

वी के सक्सेना पूर्वी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी नाशिक, वाराणसी, गांधी नगर आणि दिल्लीच्या काही भागातही चंदन लागवडीचे प्रयोग केले होते. तेव्हापासून सक्सेना जणू चंदनाच्या झाडाच्या प्रेमात पडलेत.

"चंदनाच्या झाडाच्या पोषणासाठी दिल्ली किंवा इतर शहरात पोषक वातावरण नाही असे सांगितले जाते. मात्र राजघाटवर लावण्यात आलेल्या चंदनाची झाडे एक वर्षात ९ ते १० फूट इतकी उंचीचे झालेत. त्यामुळे दिल्लीमधील शेतकऱ्यांनी प्रत्येकी कमीत कमी चार चंदनाचे झाडांची लागवड केली पाहिजे "असे सक्सेना म्हणाले.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते मात्र दिल्लीतील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान लक्षात घेता येथे चंदन लागवडीचा सल्ला देणे अशास्त्रीय ठरेल. दिल्लीमध्ये चंदनाच्या झाडांना पोषक वातावरण नाही. लागवडीनंतर ही झाडे उगवून येतील, परंतु त्यातून आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. कारण त्यांची पुरेशी वाढ होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, चंदनाच्या झाडासाठी जोरदार पाऊस आणि चांगला निचरा होणारी जमीन लागते. दिल्लीत या गोष्टींचा अभाव असल्याने चंदन लागवड फायदेशीर ठरणार नाही, असं जाणकार सांगतात.

"चंदनाची झाडे यमुना पट्ट्यात किंवा अरवली प्रदेशात वाढू शकत नाहीत. कारण त्यांना पोषक वातावरण तिथे मिळत नाही. चंदनाचे झाड अर्ध-परजीवी आहे. ते पोषणासाठी इतर झाडांवर अवलंबून असते. त्यामुळे दिल्लीतील वातावरणात चंदनाचे झाड तग धरू शकत नाही." असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

नायब राज्यपालांना मात्र चंदन लागवड हा स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग वाटतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये चंदन लागवडीमुळे व्यावसायिक फायदेही होतील. चंदनाचे उत्पादन वाढल्यास चंदनाच्या झाडाचे तेल आणि पावडर यांच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे नायब राज्यपालांचे मत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com