Moringa Cultivation : शेवगा लागवड योजनेतून सवलतीत बियाणे मिळणार

सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत एकूण अकरा तालुक्यातून १० गुंठे/आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत क्षेत्राकरिता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीकरिता शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) राबविण्यात येत आहे.
Moringa Cultivation
Moringa CultivationAgrowon

सोलापूर : सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत (Department Of Animal Husbandry) एकूण अकरा तालुक्यातून १० गुंठे/आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत क्षेत्राकरिता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीकरिता शेवगा लागवड (Moringa Cultivation) करणे (अनुसूचित जाती उपयोजना) राबविण्यात येत आहे. इच्छुक पशुपालकांनी आठ जानेवारीपर्यंत आपले अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर परांडे यांनी केले आहे.

Moringa Cultivation
Moringa Cultivation : उस्मानाबादला शेवगा लागवड योजनेत पावणेदोन कोटींचा गैरव्यवहार

या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा १० गुंठे / आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत, प्रति १० गुंठे ७५० ग्रॅम शेवगा (पीकेएम-१) बियाणाची किंमत रु.६७५/- व उर्वरित अनुदान रु. २३२५/- असे एकूण अनुदान रु.३००० दिले जाणार आहे.

तसेच प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीत कमी व अधिकतम एक हेक्टर असून, प्रति हेक्टर ७.५ किलो शेवगा (पीकेएम-१) बियाण्याची किंमत रु.६७५०/- व उर्वरित अनुदान रु.२३,२५०/- हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून, उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर आनुषंगिक खर्च करावयाचा आहे. या योजनेकरिता पशुपालक/शेतकरी यांनी संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com