
Nanded News : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत (Horticulture Scheme) महाडीबीटीच्या (MahaDBT) माध्यमातून ८८६ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यात लॉटरी पद्धतीने ८१८ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात २०१८-१९ पासून सुरु करण्यात अली आहे. परंतु मागील काही वर्ष या योजनेला गुंडाळण्यात आले होते.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुन्हा योजनेला मुहूर्त लागला आहे.
या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी पन्नास टक्के, दुसऱ्या वर्षी तीस टक्के तर तिसऱ्या वर्षी वीस टक्के अनुदान देण्यात येते.
या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हेक्टर क्षेत्र मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ८८६ शेतकऱ्यांनी महाडिबीटीवर अर्ज सादर केले.
यात अनुसूचित जाती १२२, अनुसूचित जमाती ३६ तर सर्वसाधारण गटातील ७२८ अशा एकूण ८८६ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले.
यानंतर झालेल्या तपासणीअंती ८१८ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी निवड झाली आहे. यात अनुसूचित जाती ११३, अनुसूचित जमाती ३३ तर सर्वसाधारण गटातील ६७२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवरुन कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.