एक लाख ४४ हजार घरांत नळ जोडणार

पुणे विभागातील स्थिती; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जोडण्या
एक लाख ४४ हजार घरांत नळ जोडणार
Drinking WaterAgrowon

पुणे : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत (Jal Jeevan Mission) पुणे विभागातील सुमारे एक लाख ४४ हजार घरांना पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) स्वतंत्र नळजोडणी (Tap Connection) मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लवकरच कामे सुरू करणार आहे. हा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक नळजोडणी जिल्ह्यात होईल. त्याची संख्या ८९ हजार ६७१ एवढी आहे.

Drinking Water
पंजाबमध्ये पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना बक्षीस

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील ग्रामीण भागात राहणाऱ्‍या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मागील काही वर्षांपासून नळजोडणी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी काही निधी थेट केंद्राद्वारे मिळत असतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे नळजोडणी प्रकल्प राबविण्यात येईल. त्यानुसार या प्राधिकरणास दोन हजार २११ कोटी रुपयांच्या १०१ योजना करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ९१ योजनांची कामे लवकरच सुरू होतील. त्यासाठी एक हजार ७४५ कोटींच्या निधीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. उर्वरित दहा योजनांची निविदा प्रशासकीय स्तरावर प्रगतीत आहे. या योजनेमुळे पुणे विभागातील ग्रामीण भागात राहत असलेल्या नागरिकांना प्रत्येकी दोन नळजोड मिळतील.

विभागातील नळजोडणी मिळणारे जिल्हे, संख्या

जिल्हा---नळजोडणी

पुणे ---८९६७१

सातारा ---२५४४०

सांगली ---१६०५९

सोलापूर---४९३२

कोल्हापूर---८४१०

‘‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य अभियंतापदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक बदल करण्यात आले. नळ पाणी योजनांत अडथळा ठरणाऱ्‍या बाबी विशेषतः राज्य दर सूची अद्ययावत करणे, भाववाढ करण्याच्या निविदा कामांमध्ये समाविष्ट करणे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे ही कामे मार्गी लावण्यास मदत झाली.
राजेंद्र रहाणे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com