Loan Repayment : शिखर बॅंकेची कर्जपरतफेड योजना घोषित

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसह अन्य संस्थांकडील पावणे दोन हजार रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेने परतफेड योजना घोषित केली आहे
Loan Repayment Scheme
Loan Repayment SchemeAgrowon

पुणे ः राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसह (Co Operative Sugar Mills) अन्य संस्थांकडील पावणे दोन हजार रुपयांची थकीत रक्कम (Loan Amount) वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेने (Maharashtra State Co Operative Bank) परतफेड योजना (Loan Repayment Scheme) घोषित केली आहे आहे. या योजनेकडे सहकारातील कर्जदार थकबाकीदार संस्थांचे लक्ष लागून होते.

बॅंकेच्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील आजारी साखर कारखाने व इतर सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र सामोपचार परतफेड योजना लागू करावी, असा प्रस्ताव मांडला गेला असता तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे केवळ सहा टक्के सरळ व्याज भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. थकीत रक्कम १७५६ कोटींच्या आसपास आहे. त्यातील किमान ६० टक्के रक्कम वसूल होईल, असा अंदाज शिखर बॅंकेचा आहे.

Loan Repayment Scheme
पीक कर्ज व्याजावरील परतावा सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

‘‘थकीत कर्जाची वसूली होण्यासाठी इतर कर्जदारांपेक्षाही काही संस्थांना व्याजदरामध्ये जादा सवलत आणि परतफेडीसाठी जादा मुदत देणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे या योजनेत तशी काळजी घेण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काही साखर कारखाने व सहकारी संस्था, उद्योगांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही,’’ असे शिखर बॅंकेने स्पष्ट केले आहे.

Loan Repayment Scheme
काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना ?

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये

- अनुत्पादित वर्गवारीत ता. ३१ मार्च २०२२ अखेर समाविष्ट झालेले सर्व साखर कारखाने व सहकार कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व सहकारी संस्थांना लाभ

- जामीनदार हे सहकर्जदार असल्याने या योजनेतंर्गत कर्जदाराबरोबरच जामीनदारांनाही स्वतंत्रपणे किंवा एकत्रित संस्थेच्यावतीने अर्ज करता येईल.

- सरफेसी कायद्यांतर्गत नोटीस, वसुलीसाठी कायदेशीर कारवाई चालू असलेली, राज्य बँकेने ताब्यात घेतलेल्या तथापि अद्याप विक्री न झालेल्या व अॅवार्ड प्राप्त झालेल्या अनुत्पादित कर्ज वर्गवारीमधील संस्थांना योजना लागू .

- राज्य बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी झाल्या असतील व त्यांनी तडजोड रकमेचा भरणा केला नसल्यामुळे त्या संस्थांना बँकेने सदर योजनेतून अपात्र झाल्या असतील अशा संस्थांनाही योजना लागू राहील.

- फसवणूक, गैरव्यवहार करून घेतलेली कर्जे व जाणीवपूर्वक थकविलेली, ताबेगहाण, न्यायालयासमोर तडजोडीची, शासकीय हमीची, मूळ हेतू सोडून इतर कारणांसाठी वापरलेल्या कर्जांचा, यापूर्वीच परतफेडीत सहभागी झालेल्या संस्थांचा, योजनेत समावेश नाही.

- आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था, कंपन्या,संस्थांना दिलेल्या कर्जांना अथवा त्यांचे जामीनपात्र असलेल्या कर्जांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सवलत मिळणार नाही.

- संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिलेल्या कर्जांसाठी अथवा ते जामीनदार असलेल्या कर्जांना सदर योजना लागू होणार नाही. ( येथे `कुटुंब' म्हणजे पत्नी, पती, आई, वडील, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून)

- पगारदार संस्थेच्या मालकांशी जर पगारकपातीचा करार झाला असेल तर अशा पगारदारांना दिलेल्या खावटी कर्जांसाठी सदर योजना लागू होणार नाही.

स्पर्धात्मक युगात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या साखर कारखान्यांना तसेच सहकार आजारी संस्थांना कर्जमुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच शेतकरी वर्गाचा जलद विकास शक्य आहे. तोच हेतू ठेवत शिखर बॅंकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना आणली आहे.
विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com