Solar Agriculture Scheme : आठ गावांतील दोन हजार शेतकऱ्यांना ‘सौर कनेक्शन’

Chief Minister Solar Agriculture Scheme : रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाच्या वीजपुरवठ्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना सुरू केली आहे.
 solar panel
solar panel Agrowon

Solar Agriculture Scheme News : रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाच्या वीजपुरवठ्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना सुरू केली आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव व जत तालुक्यातील आठ गावांतील २२०० शेतकऱ्यांना लवकरच वीजपुरवठा सुरू होणार आहे. त्यात नागेवाडी व वाळेखिंडी येथे ७.५६ मेगावॉटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प ५ मे रोजी ‘महानिर्मिती’ने कार्यान्वित केले आहेत.

नागेवाडी (ता. तासगाव) व वाळेखिंडी (ता. जत) येथील आठ गावांतील २ हजार २०० शेतकऱ्यांकडे लवकरच सौर कृषी वाहिनीतून वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.

नागेवाडी (ता. तासगाव) येथील प्रकल्पाची स्थापित क्षमता ४.२ मेगावॉट आहे. या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना नागेवाडी, अंजनी, वडगाव व लोकरेवाडीतील सुमारे १२०० ते १३०० ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

 solar panel
Solar Agricultural Pumps : सौर कृषिपंप देण्याच्या नावाखाली फसवणूक

सदर प्रकल्प ‘महावितरण’च्या ३३/११ के.व्ही. अंजनी नागेवाडी उपकेंद्राला जोडला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १५ कोटी आहे.

वाळेखिंडी (ता. जत) येथील प्रकल्पाची क्षमता ३.३६ मेगावॉट आहे. या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना वाळेखिंडी, बेवनूर, शिंदेवाडी आणि नवलेवाडी या गावांतील सुमारे एक हजार कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार आहे.

सुमारे ८ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १२ कोटी आहे. नजीकच्या ‘महावितरण’च्या ३३/११ के.व्ही. वाळेखिंडी उपकेंद्राला सदर प्रकल्प जोडला आहे.

या दोन सौरऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी १० ते १५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौरऊर्जेद्वारे सुमारे ३.३० रुपये प्रति युनिट दराने वीज मिळणार असून, महावितरण समवेत वीज खरेदी करार केला आहे. येत्या काही महिन्यांत ‘महानिर्मिती’चे बोर्गी (जि. सांगली) २ मेगावॉट, सौरऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.

 solar panel
सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस एकरांत फळबाग
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजना नागेवाडी, वाळेखिंडी येथे दोन सौरऊर्जा प्रकल्प ‘महानिर्मिती’ने कार्यान्वित केले आहेत. या परिसरातील आठ गावांतील दोन हजार दोनशे शेतकऱ्यांकडे लवकरच वीजपुरवठा सुरु केला जाईल. सध्या उत्पादन व मागणीबाबत चाचपणी सुरू आहे.
धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com