Irrigation : बंदिस्त वाहिकेतून लवकरच पाणी शेतात

समन्यायी पाणीवाटप पथदर्शी प्रकल्पातून तालुक्यातील साठ गावांच्या छप्पन्न हजार हेक्टर लाभक्षेत्राला बंदिस्त वितरिकेतून प्रत्येक आवर्तनाला मोजून पाणी मिळणार आहे.
Irrigation
IrrigationAgrowon

आटपाडी, जि. सांगली ः समन्यायी पाणीवाटप (Water Allocation) पथदर्शी प्रकल्पातून तालुक्यातील साठ गावांच्या छप्पन्न हजार हेक्टर लाभक्षेत्राला (Irrigation) बंदिस्त वितरिकेतून प्रत्येक आवर्तनाला मोजून पाणी मिळणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प आहे.

Irrigation
Irrigation : वाया जाणारे पाणी डावा कालव्यातून तलावात सोडा

टेंभूचे घाणंद तलावात पाणी आले आहे. तेथून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी हिवतडमार्गे सांगोला, झरे मार्गे दिघंचीकडे गेले. या कालव्यावरून चार मोठ्या लोखंडी वितरिका शेवटच्या टोकापर्यंत नेली आहे. मुख्य वितरिकेला दोन्ही बाजूंनी जागोजागी एचटीपी पोटवितरिका जोडल्या आहेत. त्या लाभक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रत्येक गटाच्या शेतात सर्व्हे नंबरवरून छोट्या पाइपने नेल्या जाणार आहे. तिथे तलाव, बंधारा, शेततळे, विहिरीत साठा केला जाणार आहे.

Irrigation
Sustainable Irrigation : बंदिस्त पाणीपुरवठ्यामुळे शाश्‍वत सिंचन

तालुक्यातील अनेक गावांना दोन वाहिकेतून पाणी जाणार आहे.‌ या वाहिका उचवट्यावरून गेल्या आहेत. गावचा एक भाग एका आणि दुसरा भाग दुसऱ्या वाहिकेवर आहे. थेट कालव्यातून सायफनने पाणी मिळणार आहे. मुख्य आणि उपवाहिकेची कामे झाली आहेत. सध्या लाभक्षेत्र विकसित करण्याची टोकाची कामे सुरू आहेत. त्यासाठी ४५ क्लस्टर निर्माण केली असून, सध्या ८ व ९ मध्ये काम सुरू आहे. यांच्या जोडीला पाणी वापर संस्था स्थापन करून पाणीसाठे करायची ठिकाणे, पीक पद्धती, लागणारे पाणी, त्याचे वाटप याचे नियोजन ठरवायचे आहे.

मुख्य वाहिका जाणारा मार्ग

अ) खरसुंडी- खरसुंडी, धावडवाडी, नेलकरंजी, बाळेवाडी, औटेवाडी, बनपुरी, मिटकी, शेंडगेवाडी, अर्जुनवाडी, औटेवाडी, हिवतड, मानेवाडी, गोमेवाडी, अर्जुनवाडी, काळेवाडी, तळेवाडी, करगणी, पात्रेवाडी, माळेवाडी, शेटफळे, शेंडगेवाडी, भिंगेवाडी, आटपाडी, मासाळवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे, य.पा.वाडी.

ब) घाणंद - जांभूळणी, निंबवडे, शेरेवाडी, मुढेवाडी, विठलापूर, कौठूळी, कामत, मुढेवाडी, शेंडगेवाडी, भिंगेवाडी, मापटेमळा, देशमुखवाडी, पुजारवाडी, आंबेवाडी, पिंपरी खुर्द.

क) दिघंची- झरे, पडळकरवाडी, पालेकरवाडी, कुरूंदवाडी, दिघंची, पळसखेल, उबरगाव.

ड) कामथ - पिंपरी, लिगीवरे, राजेवाडी, पुजारवाडी, बोंबेवाडी.

प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शिवारापर्यंत लवकरच बंद वाहिकेने पाणी जाणार आहे. तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही.
डॉ. भारत पाटणकर, श्रमिक मुक्तिदल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com