पावणेतीनशे शेतकऱ्यांना कडबाकुट्टीसाठी अनुदान

गेल्या वर्षीच्या कोरोना संसर्गाचा कडबाकुट्टी अनुदान वाटपाला फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्केच निधीची तरतूद केली आहे.
Agriculture Machinery
Agriculture MachineryAgrowon

नगर ः शेतकऱ्यांना कडबाकुट्टी (Subsidy For Kadbakutti Machine) खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अनुदान (Subsidy) दिले जात असून, यंदा सुमारे २७७ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या कोरोना संसर्गाचा कडबाकुट्टी अनुदान (Kadbakutti Subsidy) वाटपाला फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्केच निधीची तरतूद केली आहे.

Agriculture Machinery
Fisheries Technology : नव्या मत्स्यपालन तंत्रज्ञानामुळे वाढले उत्पन्न

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या योजनांत कडबाकुट्टीला अधिक मागणी असते. कडबाकुट्टीसाठी प्रत्येकी लाभार्थ्यांला ९ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र मागणीच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या कमीच असते. गेल्या वर्षी या योजनेवर खर्च करण्यासाठी ५२ लाखांची तरतूद केली होती. त्यामुळे गतवर्षी (२०२०-२१) ५७७ लाभार्थी शेतकऱ्यांना कडबाकुट्टीसाठी अनुदान मिळाले होते.

Agriculture Machinery
Agriculture Technology : आयओटी ही काय भानगड आहे?

मात्र गेल्या वर्षी कोरोनासारख्या संकटामुळे अर्थसंकल्पाच्या तरतुदीत घट झाली. २०२१-२२ या वर्षासाठी २५ लाखांची तरतूद केली. त्यामुळे यंदा निम्म्याने लाभार्थी घटले आहेत. यंदा २७७ लाभार्थ्यांनाच कडबाकुट्टीसाठी अनुदान मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने निवडलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरित केला आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कडबाकुट्टी घेतली की नाही याची खात्री झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना अनुदान वितरित होणार आहे.

Agriculture Machinery
Agriculture Technology : नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या निधीत गैरव्यवहाराचा संशय

वाटपात साधला समतोल

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून कडबाकुट्टी खरेदीसाठी अनुदानाला अधिक मागणी आहे. कडबाकुट्टीच्या अनुदानासाठी लाभार्थी निवडताना पदाधिकाऱ्यांची शिफारस घेतली जात होती. शिवाय अधिक लाभार्थ्यांना कृषी विभागाशी संबंधित नेत्यांनी अनुदान मिळण्यासाठी तालुका पातळीवरील वाटपात असमतोल झाला होता. यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले होते. यंदा मात्र जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे.

त्यामुळे प्रशासनाने कडबाकुट्टी अनुदान लाभार्थी निवडताना समतोल साधल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा अकोले, कोपरगाव, राहाता, तालुक्याला १९, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत तालुक्याला प्रत्येकी १७, पारनेर, राहुरी तालुक्याला प्रत्येकी २०, संगमनेरला ३१, श्रीगोंदा, नगर तालुक्याला २२ व जामखेडला १२ व नेवाशाला २५ लाभार्थी असणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com