Banana Cultivation : केळी लागवडीसाठी ‘रोहयो’अंतर्गत दहा प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी पिकाच्या समावेशाबाबत शासनाने (निर्णय क्रमांक फळबाग २०२२/ प्र.क्र.३५/मग्रारो-५/मंत्रालय मुंबई १५ डिसेंबर अन्वये) केळी (३ वर्षे) पीक नव्याने समाविष्ट केले आहे.
Banana cultivation continues in Khandesh
Banana cultivation continues in KhandeshAgrowon

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) केळी पिकाच्या (Banana Crop) समावेशाबाबत शासनाने (निर्णय क्रमांक फळबाग २०२२/ प्र.क्र.३५/मग्रारो-५/मंत्रालय मुंबई १५ डिसेंबर अन्वये) केळी (३ वर्षे) पीक नव्याने समाविष्ट केले आहे.

Banana cultivation continues in Khandesh
Banana Production : केळीसह नगदी पिकांत गाढोदेची ओळख

या योजनेत दहा संवर्गातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यात केळी पिकाचे लागवड अंतर १.८४१.५० मीटर असावे लागेल. प्रथम वर्ष अनुदान प्रतिहेक्टर रक्कम एक लाख ७३ हजार ८४, दुसऱ्या वर्षासाठी ४३ हजार ७४८, तिसऱ्या वर्षासाठी ३६ हजार २००, असे एकूण दोन लाख ५३ हजर ३२ रुपये तीन वर्षांसाठी देय राहील.

प्रवर्ग असे : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधी सूचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ खालील पात्र लाभार्थी.

Banana cultivation continues in Khandesh
Banana Cultivation : खानदेशात केळी लागवड सुरूच

उपरोक्त प्रवर्गामधील १ ते १० पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्जमाफी योजना २००८ या मध्ये व्याख्या केलेले अल्पभूधारक (५ एकरांपर्यंत) सीमांत भूधारक (२.५ एकरांपर्यंत) यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. क्षेत्र मर्यादा या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर क्षेत्र व जास्तीत जास्त २०० हेक्टर क्षेत्र मर्यादा आहे.

मजूर कार्ड (जॉब कार्ड), ग्रामपंचायतीने मान्य केलेली लाभार्थी यादीत नाव असणे आवश्यक, प्रपत्र ‘अ’ अर्जाचा नमुना प्रपत्र व संमतीपत्र (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषी विभागापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे, याचा स्पष्ट उल्लेख लाभार्थ्याने करावा.),

लागवड करावयाच्या जागेचा ७/१२ उतारा, ८ ‘अ’ खाते उतारा ही कागदपत्रे लागतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकरे यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com